Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
Uncategorized

मंदिर व घरांत घरफोडी

देवीच्या अंगावरील सुमारे २ ग्रॅम  वजनाचे दागिने लंपास

नागोठण्याजवळील बाळसई गावातील मंदिर व ९ घरांत घरफोडी

नऊ बंद घरे व ग्रामदेवता श्री बेलजाई मातेच्या मंदिरात चोरी : देवीच्या अंगावरील सुमारे २ ग्रॅम  वजनाचे दागिने लंपास
रेकी करून बंद घरे फोडल्याचा संशय
नागोठणे | महेश पवार
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागोठण्याजवळील बाळसई गावात ९ बंद घरे व ग्रामदेवता श्री बेलजाई मातेचे मंदिर फोडल्याची घटना समोर आली आहे. या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी श्री बेलजाई मातेच्या अंगावरील साधारण २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र व नथ चोरट्यांनी लंपास केले आहे. तसेच दान पेटतील सुमारे ८ ते  १० हजारांची रोकडही चोरण्यात आली आहे. चोरीची ही घटना शनिवारी(दि. १८) रात्री घडली आहे. मंदिरातील बंद स्थितीत असलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची मशीनही चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान नागोठणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे. यातील मंदिरातील चोरी प्रकरणी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नागोठणे ग्रामीण भागातील बाळसई गावात प्रथमच झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 
बाळसई गावात घरफोडी करतांना घरफोडी केलेल्या घरांच्या शेजारील घरांना बाहेरून कड्या लावून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे.  चोरी झालेले बहुतांश घरमालक हे कामानिमित्त मुंबई, ठाणे येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या घरातील चोरीची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
घरफोडी झालेल्या बंद घरांमध्ये बाळसई गावातील परंतु मुंबई येथे वास्तव्यास असलेले निवृत्त पोलिस अधिकारी भिकाजी पवार, भिकाजी जाधव, शरद जाधव, स्वप्निल पाटेकर या चार जणांचा समावेश आहे. तसेच वाकण – आमडोशी मार्गे रोहा  रस्त्यालगत मात्र बाळसई गावाच्या हद्दीत असलेल्या  तीन घर मालकांत शांताराम खांडेकर, दौलत कोकाटे, नारायण फराडे यांचा समावेश आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत घरफोडी झालेल्या घर मालकांत अनंत ठमके व कृष्णा मुंडे यांचा समावेश आहे.
दरम्यान यासंदर्भात बाळसई गावचे पोलिस पाटील पंकज कोकाटे यांना रविवारी(दि.१९) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना समजल्यानंतर त्यांनी नागोठणे पोलिस ठाण्याला सकाळी दिलेल्या माहितीनुसार नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांनी आपल्या पोलिस पथकासह बाळसई गावातील चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याशिवाय फिंगर प्रिंट तज्ञ, फॉरेन्सिक टीम व श्वान पथकानेही चोरी झालेल्या मंदिर व इतर सर्व घरांच्या  ठिकाणी भेट देऊन कसून तपास केला आहे. दरम्यान याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!