E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

वरदाई चारिटेबल ट्रस्ट तर्फे नागोठण्यात आज मोफत आरोग्य शिबिर

गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य

वरदाई चारिटेबल ट्रस्ट तर्फे नागोठण्यात शनिवारी मोफत आरोग्य शिबिर

गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य
नागोठणे | महेश पवार
नुकत्याच संपन्न झालेल्या ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोहा येथील वरदाई चारिटेबल ट्रस्ट व गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान नागोठणे ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य शिबिराचा नागोठणे शहर व विभागातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 
या मोफत आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.  यामध्ये नेत्र रोग तज्ञ असलेले डॉ. रत्नदीप गवळी यांच्याकडून मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांचा संसर्ग, रेटीनाचे आजार, डोळ्यांची तपासणी,  डोळ्यांना इजा व दृष्टी कमी होणे,  डोळ्यांच्या आजारावर औषधोपचार आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. तर कन्सल्टंट फिजिशियन डॉ. नयन ब्राम्हो यांच्याकडून मधुमेह,  उच्च रक्तदाब,  थायरॉईडचे आजार,  कोलेस्ट्रॉल वाढणे, ताप व संसर्गजन्य आजार,  डेंगू, मलेरिया, टायफाईड, मूत्रमार्गाचे संसर्ग आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. या शिबिरात नोंदणी केलेल्या रुग्णांना अनेक सुविधा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिरात सीबीसी, ब्लड शुगर, थायरॉईड, युरीन, ईसीजी या  तपासण्या मोफत करून मिळणार आहेत. या मोफत आरोग्य शिबिरात नोंदणी करण्यासाठी ९३२४७११०१०/९३२४८६१०१० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
नागोठण्यातील या मोफत आरोग्य शिबिरास सकाळी माजी आमदार अनिकेतभाई तटकरे उपस्थित राहणार असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी व शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!