E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

सुका कचरा व प्लास्टिक जमा करण्याच्या स्पर्धेतील विजयी महिलांचा सन्मान  

नागोठणे ग्रामपंचायतीचा आगळा वेगळा उपक्रम

सुका कचरा व प्लास्टिक जमा करण्याच्या स्पर्धेतील विजयी महिलांचा सन्मान  

नागोठणे ग्रामपंचायतीचा आगळा वेगळा उपक्रम
नागोठणे | महेश पवार
नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांत व महिला वर्गात स्वच्छता विषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि आपला परिसर स्वच्छ रहावा यासाठी सुका कचरा व प्लास्टिक जमा करण्याची एक आगळी वेगळी स्पर्धा नागोठणे ग्रामपंचायतीकडून शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता नागोठणे ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीसमोरील प्रांगणात घेण्यात आली. यावेळी लकी ड्रॉ काढून निवड झालेल्या पाच महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. 
नागोठणे ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार सुका कचरा व प्लास्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नागोठण्यातील सुमारे १७ महिलांनी सहभाग घेतला होता.  लकी ड्रॉ मधून प्रथम क्रमांक मीना शिर्के (कुकर), द्वितीय क्रमांक प्रीतम कडव (पाच लिटर जेमिनी गोडेतेल), तृतीय क्रमांक (पाच किलो कपड्याची सर्फ  पावडर), चतुर्थ क्रमांक सायली ताडकर (पाच किलो साखर) व पाचवा क्रमांक संचिता ठोंबरे (कपड्याचे फेमिया साबण सेट) यांना गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या शोभा फणसेकर, स्वाती तुरे, राधिका सोनी, रीना दोषी, विजय परमार, अरुणा महाडिक, सरिता जोशी, सपना चोगले, शर्मिला चितळकर, अमिता पालकर, संचिता ठोंबरे, संगीता वैशंपायन, शिर्के वाहिनी आदींना स्पर्धेतील सहभागाबद्दल उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेत विजय ठरलेल्या सर्वांना नागोठण्याच्या  सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे,  ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे, अमृता महाडिक भाविका गिजे आदींसह  ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांत स्वच्छतेविषयी जागरूकता होण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये भविष्यात वेगवेगळे बदल होणार असून दर महिन्याला ही स्पर्धा ठेवण्याचा आमचा मानस असून जो कोणी जास्तीत जास्त सुका कचरा व प्लास्टिक गोळा करून घेऊन येईल त्यांना जमा केलेल्या सुक्या कचऱ्याच्या व प्लास्टिकच्या  वजनानुसार क्रमांक दिले जातील तसेच भविष्यात या स्पर्धेच्या स्वरूपात नवनवीन बदल केले जातील.
– राकेश टेमघरे,  ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत नागोठणे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!