Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठण्यातील जोगेश्वरी नगर मध्ये श्री रामनवमी सोहळा उत्साहात संपन्न

भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ 

फोटो : श्री राम नवमीच्या निमित्ताने जोगेश्वरी नगर मधील पालखी सोहळ्यात सहभागी झालेले ज्ञानेश्वर साळुंखे, विशाल(बंटी )मांडे, सौ.अंकिता मांडे व अन्य भाविक
नागोठण्यातील जोगेश्वरी नगर मध्ये श्री रामनवमी सोहळा उत्साहात संपन्न

भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ 

नागोठणे | महेश पवार 

नागोठण्यातील विविध भागांत श्री राम नवमी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. नागोठण्यातील पुरातन राम कुंड येथील श्रीराम मंदिर, नवीन रामेश्वर मंदिर, गवळआळी येथील श्री राधाकृष्ण मंदिर तसेच जोगेश्वरी नगर येथील श्री राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जोगेश्वरी नगर (गावठाण) मधील श्री राम नवमी उत्सव सोहळ्यानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवसापासून गुरुवार दिनांक १९ मार्च पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोजी सायंकाळी आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

(श्री राम नवमीच्या पालखीचे स्वागत करताना जोगेश्वरी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न राय व परिवार)

त्याचप्रमाणे येथील जोगेश्वरी नगर (गावठाण) मध्ये श्रीराम नवमी निमित्त गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ वा. महापूजा, सकाळी ११ ते १२ वा. श्रीराम जन्म तसेच सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेला पालखी सोहळा संपूर्ण जोगेश्वरी नगर मध्ये फिरल्यानंतर रात्री ९ वाजता पालखी मंदिरात पोचल्यानंतर पूर्ण झाला.  त्यानंतर सामूहिक महाआरती घेण्यात आली. त्यानंतर रात्री झालेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याचा समारोप करण्यात आला.  यावेळी जोगेश्वरी नगरसह नागोठण्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री राम नवमी उत्सवाच्या निमित्ताने नागोठण्याचे सपोनि. सचिन कुलकर्णी व अनेक मान्यवरांनी जोगेश्वरी नगरमधील श्री राम मंदिरात येऊन दर्शन घेतले. यावेळी नागोठणे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ज्ञानेश्वर साळुंखे आणि उत्सव समितीने सपोनि. सचिन कुलकर्णी, उपनिरीक्षक नरेश थळकर, उपस्थित पोलिस कर्मचारी व अनेक मान्यवरांचे स्वागत केले. हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी आयोजक असलेले ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ जोगेश्वरी नगर तसेच तरुण वर्गाने अपार मेहनत घेतली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!