E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
शेतपळसच्या श्री आकादेवी मातेचा ३ एप्रिलला पालखी सोहळा
मंदिरासमोर भरणार भव्य यात्रा

शेतपळसच्या श्री आकादेवी मातेचा ३ एप्रिलला पालखी सोहळा
मंदिरासमोर भरणार भव्य यात्रा
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील शेतपळस येथील जागृत देवस्थान व परिसरातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री आकादेवी मातेचा चैत्र पा लखी सोहळा व यात्रौत्सव शुक्रवार दि. ३ एप्रिलला पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा होणार असून या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती श्री आकादेवी माता मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष वामन डाकी व पालखी उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद डाकी यांनी दिली. श्री आकादेवी मातेच्या या पालखी सोहळ्यानिमित्त श्री अकादेवी मंदिरासमोर भव्य यात्रा भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले
श्री आकादेवी मातेच्या या चैत्र पालखी सोहळ्या निमित्ताने शेतपळस गावाच्या हद्दितील मुंबई – गोवा महामार्गलगत असलेल्या मातेच्या मंदिर परिसरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही यात्रा भरणार आहे. श्री आकादेवी मातेच्या चैत्र पालखी सोहळ्याची सुरुवात होण्यापूर्वी शेतपळस गावातील श्री मरुआई मातेच्या मठातून दुपारी १२ वाजता सजविलेली पालखी कोलेटी गावातील बेंजो पथकाच्या व पारंपरिक वाद्यांच्या साथीने वाजत-गाजत शेतपळस गावालगतच्या खाडीतून व शेतातून श्री आकादेवी मंदिराजवळील माळावर सायंकाळी ४ ते ५ वा. च्या सुमारास पोहोचल्यानंतर मंदिराभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालण्यात येणार आहेत. त्यानंतर पालखी मंदिरात नेण्यात येईल. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर रात्री १० वाजता मंदिरात सामूहिक आरती झाल्यानंतर पालखी महामार्गावरुन न नाचविता जलदरीत्या शेतपळस गावात ग्रामस्थांना दर्शन देण्यासाठी प्रवेश करेल. त्यानंतर पालखी शेतपळस गावात फिरवून दुस-या दिवशी सकाळी ८ ते ९ वा. पर्यंत पुन्हा श्री मरुआईच्या मंदिरात पोहोचल्यावर हा पालखी सोहळा पूर्ण होईल. या पालखी सोहळ्या निमित्ताने शेतपळस गावात पताका व सजावटीसह पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थ व महिलांकडून करण्यात आली आहे. पालखीच्या दिवशी गावातील प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहेत. तसेच सन २००८ या वर्षापासून मातेच्या पालखी सोहळ्यादरम्यान मद्यविक्री व मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आल्याने हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे व आनंदाने साजरा होत असल्याचे श्री आकादेवी माता मंदिर देवस्थानचे अध्यक्ष वामन डाकी यांनी सांगितले. हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी यात्रा- पालखी उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद डाकी, उपाध्यक्ष निलेश डाकी, सुभाष डाकी, संकेत डाकी, मयूर डाकी, शिवाजी घासे, योगेश डाकी, रूपेश चंदने, मनोज डाकी, संतोष माळी, कार्याध्यक्ष रुपेश डाकी, सचिव राहुल डाकी, खजिनदार शैलेश घासे, सहखजिनदार विकास डाकी, सर्व सल्लागार किरण डाकी, विश्वास डाकी, रमण डाकी, गणपत डाकी, भास्कर डाकी, सखाराम माळी, लक्ष्मण डाकी, सुनील डाकी, रविंद्र डाकी, वामन डाकी
यांच्यासह सर्व पदाधिकारी व उत्सव समिती सदस्य, ग्रामस्थ आणि महिला मंडळ मेहनत घेत आहेत.
दोन दिवस चालणा-या या पालखी व यात्रा सोहळ्यात शेतपळस, पळस, बाहेरशीव, वाघळी, कोलेटी, कोलेटीवाडी या गावांसह आजूबाजूच्या अनेक गावांतील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र-मंडळी सर्वजण एकत्रित येऊन यात्रेत सहभागी होऊन गुण्यागोविंदाने व आनंदाने यात्रा उत्सव साजरा करत असतात. त्यामुळे शेतपळससह आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्री आकादेवी मातेच्या या यात्रा व पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गाव कमिटी अध्यक्ष वामन डाकी आणि उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद डाकी यांनी केले आहे.




