Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यक्रीडाखेलयुवाराज्यलोकल न्यूज़

नागोठण्यात योगा दिन

योगा प्रशिक्षक यामिनी दिघे महिलांना दिले योगाचे धडे 

नागोठण्यात योग गुरू क्लासतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

योगा प्रशिक्षक यामिनी दिघे यांनी  महिलांना दिले योगाचे धडे 
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील योगा प्रशिक्षक यामिनी सुशील दिघे यांच्या योग गुरूकुल क्लास तर्फे नागोठण्यातील घरळी येथील निसर्गरम्य परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला. सहभागी महिलांना योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ समजावून सांगण्यात आले. नियमित योगा अभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत व सकारात्मक राहते तसेच अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी यामिनी दिघे यांच्याकडून देण्यात आली. यावेळी सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.       
महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्यास प्रोत्साहन देणे आणि निरोगी समाज घडविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. उपस्थित महिलांनी योगाबद्दलचे आपले अनुभवही व्यक्त केले आणि नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याची कला आहे. प्रत्येकाने दररोज काही वेळ योगासाठी देणे ही काळाची गरज आहे असे मार्गदर्शन यावेळी योगा प्रशिक्षक यामिनी दिघे यांनी उपस्थित महिलांना केले.
योगा बद्दल महिला व छोट्या मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या योगासने स्पर्धेत महिला गटात प्रथम क्रमांक वैशाली कामथे, द्वितीय क्रमांक विजया माने, तृतीय योगिनी काळे तर लहान मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मनस्वी माने, द्वितीय क्रमांक आराध्या  चितळकर व तृतीय क्रमांक ओवी काळे या सर्वांना यावेळी भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देण्यात आले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!