E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाढदिवस शुभेच्छा !
अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा

साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांना खा. सुनील तटकरेंनी दिल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
नागोठणे | महेश पवार
पेण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भाग तसेच निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या बरडावाडी-देवळी येथील साकव प्रकल्प समाजसेवी संस्थेचे सचिव अरुण शिवकर हे आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी साजरा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी रायगडचे खासदार, लोकनेते सुनिल तटकरे यांची सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी अरुण शिवकर यांचे मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन अरुण शिवकर यांचे स्वागत करून त्यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, भाई टके, साकव संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, हितचिंतक उपस्थित होते.




