E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़
नागोठण्यात पुन्हा वाहणार विकासाची गंगा
नागोठणे शहर व पंचक्रोशीतील विविध समस्यांबाबत खासदार सुनील तटकरे यांना निवेदन

खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा वाहणार विकासाची गंगा
नागोठणे शहर व पंचक्रोशीतील विविध समस्यांबाबत किशोरभाई जैन यांचे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन
नागोठणे | महेश पवार
नागोठणे शहर व पंचक्रोशीतील विविध प्रलंबित समस्या, विकासकामे तसेच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू महामंडळाचे अध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई व भाई टके यांनी अलिबाग येथील हॉटेल ताज येथे गुरुवारी (दि.२०) दुपारी भेट घेऊन त्यांना विकास कामांच्या बाबतीत सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी नागोठणे परिसरातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधान परिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे, नागोठणे ग्रामपंचायतीच्य सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक, ग्रामपंचायत सदस्य अखलाखभाई पानसरे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. प्रकाश कांबळे, अमृता अनिल महाडिक, विनीता सतीश पाटील, भाविका भरत गिजे, धनंजय जगताप आदी उपस्थित होते.
नागोठणे व पंचक्रोशीतील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत या निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. तसेच परिसरातील वाढती गुन्हेगारी, स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आणि स्थानिक नागरिकांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
याशिवाय नागोठणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांबाबतही खासदार सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून नागरिकांच्या मागण्या मांडण्यात आल्या. स्थानिक समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी हजार सुनील तटकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. तसेच नागोठणे शहर व पंचक्रोशीच्या विकासासाठी तसेच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा वाहणार विकासाची गंगा : नागोठणे शहर असो वा नागोठणे विभाग खासदार सुनील तटकरे यांनी यापूर्वीही सर्वत्र वेळोवेळी भरभरून निधी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी नागोठणे व विभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम व नवनवीन आणि विविध विकास कामांच्या प्रस्तावांच्या बाबतीत खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत यावेळी सविस्तर चर्चा केली. किशोरभाई जैन यांनी यावेळी या सर्व बाबतीत खा. सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन सादर केल्याने लवकरच या प्रस्तावांनाही खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रचंड निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा एकदा विकासाची गंगा अवतरणार असल्याचे बोलले जात आहे.




