E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़

गणेशोत्सवाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट

शिवसेना युवा नेते हरीश धामणे यांच्या हस्ते सत्कार

कोंडगाव येथील शिवराज मित्र मंडळाच्या साखरचौथ गणेशोत्सवाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट

गणरायाचे दर्शन घेत पालकमंत्र्यांनी घेतला उत्सवाचा आढावा 
शिवसेना युवा नेते हरीश धामणे यांच्या हस्ते सत्कार
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील कोंडगाव (ता.रोहा) येथे शिवराज मित्र मंडळाचा साखरचौथ गणेशोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  “१५ वर्ष अभिमानाची, उत्सवाची, परंपरा, संस्कृतीची, जपणुकीची” ही परंपरा जपत मंडळाच्या वतीने मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली होती.
साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी कोंडगाव येथे भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शिवराज मित्र मंडळ कोंडगाव व शिवकन्या ग्रुप यांच्या वतीने शिवसेना युवा नेते हरीश धामणे यांच्या हस्ते नामदार भरतशेठ गोगावले यांचा सत्कार करण्यात आला. 
धर्मवीर आनंद दिघे साहेबही गणेशोत्सवात रात्रभर शिवसैनिकांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेत असत. कोंडगाव येथे पहाटे बाप्पांचे दर्शन घेऊन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी ही प्रथा जोपासल्याचे बोलले जात आहे.  यावेळी कोंडगाव मधील  शिवसेना ज्येष्ठ नेते कृष्णाजी धामणे यांच्या समवेत शिवसेना नागोठणे विभागप्रमुख प्रविण ताडकर, शिवसेना नेते विजय धामणे, युवा नेते हरीश धामणे, विनोद धामणे, कोंडगाव शाखाप्रमुख रामचंद्र धामणे, उपशाखाप्रमुख नितेश धाडसे आदींसह शिवराज युवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखरचौथ गणेशोत्सवाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विविध भागांत गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात करून साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात आला. नागोठण्याजवळील कोंडगाव येथील शिवराज मित्र मंडळानेही गेल्या १५ वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली असून मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी नागोठणे विभागात ठिकठिकाणी साखरचौथीच्या गणपती बाप्पाला वाजत–गाजत– नाचत भक्तीभावाने भावपुर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!