Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

महसूल खात्यातर्फे नागोठण्यात शनिवारी समाधान शिबिर अभियान 

विद्यार्थ्यांना शिबिरातच मिळणार विविध प्रकारचे दाखले

महसूल खात्यातर्फे शनिवारी  नागोठण्यात समाधान शिबिर अभियान 

विद्यार्थ्यांना शिबिरातच मिळणार विविध प्रकारचे दाखले
नागोठणे | महेश पवार 
शासन निर्णयानुसार आणि रायगड जिल्हाधिकारी, अलिबाग यांचे आदेशानुसार रोहा तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या सर्वच मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” घेण्यात येत आहेत.  याचाच एक भाग म्हणून नागोठणे मंडळ अधिकारी कार्यालयामार्फत शनिवार दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नागोठणे ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शिबिरात येत्या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे जातीचे दाखले, रहिवासी दाखले, वय व आदिवास दाखले, उत्पन्नाचे दाखले, आधार कार्ड असे विविध प्रकारचे दाखले विविध शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेपूर्वी वेळेत मिळण्यासाठी रोहा तहसीलदारांच्या दालनात २६ फेब्रुवारी, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या सभेत रोहा तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक व तालुका शिक्षणाधिकारी यांना आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे विविध प्रकारच्या दाखल्यांचे फॉर्म त्यासोबत ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून आवश्यक ते पुरावे गोळा करून ते फॉर्म सोबत जोडून तहसील कार्यालयात दाखल करण्यास सांगण्यात आले होते. तसेच तयार झालेले दाखले विद्यार्थांनी कुठेही न जाता मंडळातील शिबिरांमध्ये देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसारच नागोठण्यातील या शिबिरात विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागोठणे मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील शेतकरी, विद्यार्थी व पालक यांनी या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान”
शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नागोठणे मंडळ अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!