E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

नागोठण्यातील हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांचा उरूस उत्साहात संपन्न 

उरूस मध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन

नागोठण्यातील हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांचा उरूस उत्साहात संपन्न

उरूस मध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन
दोन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल

नागोठणे | महेश पवार

नागोठण्यातील हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांचा १९४ वा उरूस शरीफ दोन दिवस ५ व ६ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या या उरूस मध्ये मुस्लिम बांधवांसह अनेक हिंदू बांधवांनी दर्ग्यात येऊन दर्शन घेतले. या उरूसच्या पहिल्या दिवशी सायंकाळी मोहल्ल्यातून दर्ग्यापर्यंत संदल मिरवणूक काढण्यात आली. पहिल्या दिवशी उरूस मध्ये नागोठणे शहरासह परिसरातील नागरिकांसह जिल्ह्यातील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या दोन दिवसांच्या उरूस मध्ये थाटलेल्या विविध प्रकारच्या दुकानांतून तसेच इतर खेळाच्या साहित्याचे व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.

हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांच्या उरुसाच्या निमिताने दर्गा व परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध खाद्य पदार्थांची दुकाने, सुकविलेली मासळी, औषधी असलेला सफेद कांदा, खेळण्याची दुकाने, शो केस मध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तू यांसह घरात लागणाऱ्या गरजेच्या सर्व वस्तू उरूस मध्ये स्वस्त व वाजवी दरात मिळत असल्याने आदिवासी बांधवांपासून, गरीब, मध्यमवर्गीय ते श्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्वच जण या उरूसमध्ये खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे दर्गा परिसर दोन दिवस गर्दीने फुलून गेला होता.
उरूसच्या दुसऱ्या दिवशी ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता आयोजित केलेला प्रसिद्ध कव्वाल अजिम नाझा व रिझवान चिश्ती यांच्यामध्ये कव्वालीचा सामना चांगलाच रंगला. या कव्वालीच्या सामन्या दरम्यान राजिप सदस्य सुमितदादा काते, पालीतील उद्योजक राजेश मपारा आदींसह विविध राजकीय पक्षाची नेतेमंडळीसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली तसेच दर्ग्याचे दर्शन घेतले. नागोठण्यातील हा दोन दिवसांचा उरूस शांततेत व उत्साही वातावरणात यशस्वी होण्यासाठी नागोठणे उरूस कमिटीचे अध्यक्ष काजिम पानसरे, उपाध्यक्ष दानिश इलामी, खजिनदार इम्रान मुल्ला, सचिव मुजफ्फर कडवेकर, सहसचिव अरबाज फामे आदींसह उरूस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली. दोन दिवसांच्या उरूस दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!