Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातनिधनमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

ट्रेलरची दुचाकीला धडक 

तरुणाचा मृत्यू व दोनजण जखमी 

कानसई येथील महामार्गावर ट्रेलरची दुचाकीला धडक 

तरुणाचा मृत्यू व दोनजण जखमी 
नागोठणे | महेश पवार
मुंबई गोवा महामार्गावर कानसई गावच्या हद्दीत दुभाजकातून महामार्गावरील दुसऱ्या बाजूला जात असताना ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेला तरुण राजनाथ बैजनाथ राय (वय : २० वर्षे), रा. एच ०६, बी. सी. जिंदाल वर्कर कॉलनी, सुकेळी याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भार्गव नबाकुमार घोष, वय – २५ व सचिनकुमार अर्जुनकुमार राय, वय: १९ वर्षे, दोघेही रा. एच ०६, बी. सी. जिंदाल वर्कर कॉलनी, सुकेळी हे जखमी झाले. हा अपघात मंगळवार दिनांक १२ मे रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. 
या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार फिर्यादी भार्गव घोष हा तरुण या राजनाथ राय व सचिनकुमार राय
यांच्यासह त्याच्या ताब्यातील हंटर मोटार सायकलवरून मुंबई गोवा हायवे रोडने नागोठणे ते जिंदाल कॉलनी सुकेळी असा प्रवास करीत होते. हे तरुण रात्री ८.४५ वा.चे सुमारास कानसई बस स्टॉप जवळ आले असता ट्रेलर चालक याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील ट्रेलर  कानसई बसस्टॉप येथील डिव्हायडर कटींग येथून वेगाने टर्न घेऊन गोवा बाजूकडे चालवीत जात असताना त्याने फिर्यादी यांचे मोटार सायकलला जोराने धडक देऊन अपघात केला. या अपघातात  फिर्यादी व जखमी यांच्या लहान मोठ्या दुखापतीस व मयत यास गंभीर दुखापती होऊन त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला व अपघाताची खबर न देता ट्रेलर चालक पळून गेला. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामधील अज्ञात ट्रेलर चालकाचा शोध सुरू असून याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!