E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gif

जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचा कु. कल्पेश मिस्त्री ९५.८० गुणांसह प्रथम

झी स्कूलचा १२ विचा निकाल १०० टक्के 

जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचा कु. कल्पेश मिस्त्री ९५.८० गुणांसह प्रथम

झी स्कूलचा १२ विचा निकाल १०० टक्के 
नागोठणे | महेश पवार
सीबीएसई चा इयत्ता १२ वीचा निकाल १३ मे रोजी सकाळी अधिकृतपणे ऑनलाईन जाहीर करण्यात आला.  जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचा सीबीएसई १२ विच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचे परीक्षेला बसलेले सर्व ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कु. कल्पेश मिस्त्री ९५.८० गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर कुमारी श्रेया कोंडे (८८.२० टक्के) व कु. आकाश भारद्वाज (८७.६० टक्के) हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कु. ऋषी जयस्वाल (८३.८० टके) व कुमारी नंदिनी पाठक (८२.६० टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे चतुर्थ व पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचे ७ विद्यार्थी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून, ९ विद्यार्थी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून, १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
जिंदाल झी स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल शाळेच्या उपमुख्याध्यापिका स्वागतीका साहू, परीक्षा प्रमुख सोमा बॅनर्जी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!