E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

रिलायन्स फाऊंडेशनचा निकाल १०० टक्के

कुमारी झुबिया अधिकारी ९४ टक्के गुण मिळवून प्रथम

रिलायन्स फाऊंडेशनचा सीबीएसई बारावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के

कुमारी झुबिया अधिकारी ९४ टक्के गुण मिळवून प्रथम
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील रिलायन्स फाऊंडेशन स्कूल – ज्युनिअर कॉलेजमधील शास्त्र शाखेचे सर्व ८ विद्यार्थी व वाणिज्य  शाखेचे सर्व ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शास्त्र शाखेत कुमार आदित्य कोनाला हा विद्यार्थी ८९.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर कुमारी गौरी गणचरी (७६ टक्के) व कुमार पार्थ पाटील (७२.२० टक्के) गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच वाणिज्य शाखेत कुमारी झुबिया अधिकारी ही विद्यार्थिनी ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कुमारी सिया मोदी (९०.८० टक्के) व कुमारी मीरा जगताप (९०.६० टक्के) या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्स फाऊंडेशनच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशांक गोयल व प्राचार्य अनुप शुक्ला यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!