Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

ठाकूर सर यांनी अनेक विद्यार्थी घडविले

मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा उत्साहात संपन्न 

विनाअनुदानित हायस्कूल मधूनही ठाकूर सर यांनी अनेक विद्यार्थी घडविले – शिवरामभाऊ शिंदे

माध्यमिक शाळा पळस चे मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर सर यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा उत्साहात संपन्न 
नागोठणे | महेश पवार
पळस येथील माध्यमिक विद्यालय विनाअनुदानित तत्वावर चालविताना हायस्कूलचे मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर सर यांनी केवळ २ हजार रुपयांत काम केले. त्यांनी खूप मेहनत घेऊन शून्यातून ही शाळा उभी केली. शाळा व्यवस्थापन समिती, पळस व कोलेटीचे त्या त्या वेळचे सरपंच तसेच येथील सर्व कार्यकर्त्यांनी ठाकूर सरांना वेळोवेळी सहकार्य केले. पगार कमी आहे म्हणून कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष न करता ठाकूर सरांनी या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. ठाकूर सरांचे पळस विद्यालयाला भविष्यातही मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना सेवानिवृत्तीच्या काळात निरोगी दीर्घायुष्य मिळावे अशा शुभेच्छा रोहा पंचायत समितीचे माजी सभापती शिवरामभाऊ शिंदे यांनी माध्यमिक विद्यालय पळस चे  मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात दिल्या.
 या कार्यक्रमाला पी एन पी संस्थेच्या चित्रलेखाताई कामानिमित बाहेर असल्याने येऊ शकल्या नसल्या तरी शाळेला अद्यापही असणाऱ्या काही समस्या यावेळी शिवरामभाऊ शिंदे यांनी कथन केल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे अधिकारी वर्ग नक्कीच या समस्या चित्रलेखाताई यांच्यापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीचे नागोठण्याजवळील पळस येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या सोहळ्याचे आयोजन  पळस माध्यमिक शाळेच्या प्रांगणात बुधवार दिनांक २० मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. यावेळी शिवरामभाऊ शिंदे यांच्यासह पेणच्या नगरसेविका सुजाता म्हात्रे, शाळेच्या स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन भोईर, माजी अध्यक्ष गणपत डाकी, आ.का.म्हात्रे गुरुजी, किशोरभाई म्हात्रे, जोमा तांबोळी, मारुती शिर्के, हिराजी शिंदे, पळसच्या सरपंच सुप्रिया डाकी, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, माजी सरपंच निष्ठा विचारे, ज्ञानेश्वर शिर्के, सतीश डाकी, शशिकांत शिर्के, बबन शिंदे, किसन बोरकर, वासुदेव तांबोळी, सखाराम ताडकर, नागोठणे केंद्र प्रमुख रुपेश पाटील, पी. एन.पी. एज्युकेशन सोसायटीचे विक्रांत वार्डे, तेजेश म्हात्रे, दिनेश पाटील, वैशाली पाटील, बचत गटाच्या सी. आर. पी. हेमा डाकी, शाळेच्या शिक्षिका सायली ठाकूर, विठ्ठल मोरे, पांडुरंग म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, संजय शिंदे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक, पी एन पी संस्थेच्या इतर शाळांतील शिक्षक, पळस–कोलेटी विभागातील नागरिक, आजी–माजी विद्यार्थी, मित्र परिवार तसेच मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांचे नातेवाईक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांचा त्यांच्या पत्नी व शाळेच्या शिक्षिका सायली ठाकूर यांच्यासह भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा परिसरातील अनेक नागरिक तसेच मोठ्या संख्येने आलेले माजी विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांना सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी कुमारी अनन्या शेलार, कुमारी मंजिरी तांबोळी व कुमारी तन्वी डाकी यांचा रोख रक्कम व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांनी शाळेला अत्यावश्यक असलेली वस्तू साऊंड सिस्टिम भेट स्वरूपात दिली. दरम्यान १४ वर्षात शाळेचा निकाल सतत १०० टक्के लावताना ९०० हून अधिक विद्यार्थी या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले हे सर्व शाळा व्यवस्थापन समिती व माझे सहकारी शिक्षक यांच्यामुळे शक्य झाल्याची भावना यावेळी मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर सर यांनी आपल्या मनोगत व्यक्त केली.
मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांचे सासरे आणि राजिपचे निवृत्त शिक्षक आ.का. म्हात्रे गुरुजी यांनी ही शाळा सुरू करताना  आलेल्या अडचणी आणि शाळा स्थापनेची पार्श्वभूमी सविस्तरपणे कथन करतांना अनेक गोड व कटू आठवणींना यावेळी उजाळा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे, विक्रांत वार्डे, हेमंत ठाकूर, बाबू तांबोळी आदींसह अनेकांनी आपल्या मनोगतातून मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांना सेवानिवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक ताडकर यांनी केले. 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!