E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़

नागोठणे ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट 

सरपंच सुप्रियाताई महाडिक,उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व सदस्यांनी केले स्वागत

माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांची नागोठणे ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट 

सरपंच सुप्रियाताई महाडिक,उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व सदस्यांनी केले स्वागत
नागोठणे | महेश पवार
राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांनी शुक्रवार दिनांक २९ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवलयास सदिच्छा भेट दिली. यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, प्रथम लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे आदींसह उपस्थित सर्व सदस्यांनी माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महादेव मोहिते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, श्रेया कुंटे, मारुती शिर्के, आनंद लाड, नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला, पूनम काळे, भाविका गिजे,  ज्योती राऊत, सुलताना लंबाते,  विनिता पाटील,  मंगी कातकरी, भरत गिजे, सागर शिर्के, अनिल महाडिक, गणेश घाग, अपर्णा सुटे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगले काम करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!