E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकामगार क्षेत्रमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़सेवानिवृत्ती
संजय काकडे यांचे कार्य यापुढेही सुरू राहील
संजय काकडे यांना सेवानिवृत्तीच्या अनेकांनी दिल्या शुभेच्छा !

रिलायन्स मधून निवृत्त होत असले तरी संजय काकडे यांचे सामाजिक व कामगार क्षेत्रातील कार्य यापुढेही सुरू राहील : किशोरभाई जैन
संजय काकडे यांना सेवानिवृत्तीच्या अनेकांनी दिल्या शुभेच्छा !
नागोठणे | महेश पवार
रिलायन्सच्या नागोठण्यातील कंपनीत ३६ वर्षे ६ महिने सेवा बजावून कामगार नेते तथा भारतीय श्रमिक शक्ती संघाचे अध्यक्ष संजय काकडे हे आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्याचा होत असलेला गौरव हीच त्यांच्या यशाची खरी पावती आहे. संजय काकडे हे रिलायन्स कंपनीतून जरी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचे सामाजिक, सहकार व कामगार क्षेत्रातील कार्य यापुढेही अविरत सुरू राहील असे गौरवोद्गार भारतीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी संजय काकडे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात काढले. तसेच रिलायन्सच्या नागोठणे युनिटचे अध्यक्ष शशांक गोयल यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचे विशेष कौतुक केले हे नागोठणेकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे मतही किशोरभाई जैन यांनी व्यक्त केले.

रिलायन्सच नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय श्रमिक शक्ती संघ या कामगार संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते संजय काकडे यांच्या सेवापूर्ती व सत्कार सोहळा रिलायन्स टाऊनशिप मधील वृंदावन सभागृहात रविवारी (दि.३१) सायंकाळी कौटुंबिक वातावरणात पार पडला त्यावेळी जैन बोलत होते.
या सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते भाई टके, किशोरभाई जैन, रिलायन्सच्या नागोठणे युनिटचे अध्यक्ष शशांक गोयल, रिलायन्सचे अधिकारी कौशिक चक्रवर्ती, श्रीकांत गोडबोले, शैलेजा सिंग, अजिंक्य पाटील, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, पहिले लोकनियुक्त सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, डॉ. मिताली धात्रक, डॉ. सनी राजेंद्र धात्रक, पत्नी सुप्रिया काकडे, आई आशालता काकडे, मुलगा सिद्धेश काकडे, मुलगी वेदिका काकडे, घिसूशेठ जैन, बाळासाहेब टके, शैलेश रावकर, प्रकाश मोरे, नितीन पत्की, कामगार नेते के. टी. शिर्के, चंद्रकांत अडसूळे, नंदकुमार कोळी, अशोक भोय यांच्यासह अनेक मान्यवर, कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्याच्या सुरुवातीलाच संजय काकडे यांचे वडील कै. मधुकर (आण्णा) काकडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संजय काकडे व त्यांच्या पत्नी, नागोठणे ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया काकडे यांचे औक्षण करून व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. केक कापून कार्यक्रमास सुरुवात झाली. या समारंभा प्रसंगी अनेक मान्यवरांनी संजय काकडे यांचे भरभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय काकडे यांनी कंपनी, अधिकारी, सहकारी कामगार, मित्रपरिवार व कुटुंबीयांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पनवेल येथील गट शिक्षण अधिकारी निंबाजी गिते यांनी केले.





