E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण
पाटणसई शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रमोददादा म्हसकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पाटणसई शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रमोददादा म्हसकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
नागोठणे | महेश पवार
संपूर्ण रोहा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या आपल्या विविध सामाजिक उपक्रमातून तालुक्यात अल्पावधीतच एक वेगळा ठसा उमटविलेले पुगाव गावचे सुपुत्र प्रमोद म्हसकर यांच्या प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा प्रतिष्ठान मार्फत नागोठण्याजवळील रा.जि.प. प्राथमिक शाळा पाटणसई येथे विद्यार्थ्यांना दफ्तर, वह्या, शालेय साहित्य, छत्री अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप गुरुवारी (दि.१८) सकाळी करण्यात आले. त्यामुळे पाटणसई शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमासाठी रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर, पाटणसई ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष मोतीराम गायकर, नागोठणे रिक्षा युनियन अध्यक्ष तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर गायकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राणे, पाटणसई प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक दामोदर शेळके, तसेच प्रमोदशेठ अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य व ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास गायकर आदी मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमासाठी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास गायकर यांनी पुढाकार घेत मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा घेऊन हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. तसेच प्रमोद अनंत म्हसकर प्रतिष्ठानचे सुधीर ढाणे यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पडला.
समाजहित, शिक्षण,आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रासाठी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे प्रमोददादा म्हसकर यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.





