Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शिक्षण

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत घवघवीत यश

एस.एस.ओ.एस.पी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत घवघवीत यश

भा.ए. सो. चे संस्थापक – अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन 
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत नागोठण्याजवळील वेलशेत येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.एस.ओ.एस.पी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून ९४.७१ टक्के गुण मिळवून कॉम्प्यूटर विभागाची कु. श्रावणी संतोष बामणे ही महाविद्यालयातून प्रथम आली आहे.
महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा एकूण निकाल  ७६.२५% इतका लागला. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाचा निकाल १०० टक्के, सिव्हिल विभागाचा ७६.४७ टक्के, मेकॕनिकल विभागाचा ९७.६० टक्के,  कॉम्प्यूटर विभागाचा १०० टक्के तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागाचा १०० टक्के  इतका निकाल लागला आहे.
इलेक्ट्रिकल विभागातून  कु. प्रियांका आप्पा चिकटे ८८.७२ टक्के, सिव्हिल विभागातून- कु. विनोद शशिकांत पाटील ८४.११ टक्के,  मेकॕनिकल विभागातून कुमार रुजल मोकल ८३.७९ टक्के,  कॉम्प्यूटर विभागातून कु. श्रावणी संतोष बामणे ९४.४१ टक्के तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग कु. अनुष्का संदीप लोखंडे ९०.७१ टक्के या विद्यार्थ्यांनी आपापल्या विभागात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच प्रथम वर्ष विभागातून कु. कुमार वरद रवींद्र चव्हाण ८६.५९ टक्के याने प्रथम क्रमांक पटकावला असून या सर्व तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. याचबरोबर संस्थेचा एकूण निकाल ९१.७२ टक्के इतका लागला असुन यशाची ही परंपरा यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष किशोरभाई जैन व संस्थेचे सीईओ कार्तिक जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. डिप्लोमा कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. ज्योती पालवे, सिव्हिल विभाग प्रमुख  प्रा. आकाश जाधव, मेकॕनिकल विभाग प्रमुख प्रा.विशाल पाटील व कॉम्प्यूटर विभाग प्रमुख प्रा. सागर सुरेकर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग प्रा.भुमिका साळवी प्रा.नीलम मंगेश पाटील या सर्व विभाग प्रमुखांची मेहनत असून कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रवेश यादव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!