E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थादिल्ली NCRमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

पाली पोलीस ठाण्यात पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

निडी – नागोठणे (वर्षा सहस्रबुद्धे) : पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) या संघटनेच्या सुधागड,  जिल्हा रायगड येथील पदाधिकाऱ्यांनी पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस मित्र संघटना व पोलीस प्रशासन यांच्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली.


या प्रसंगी रायगड उपाध्यक्ष मंगेश दगडू पालांडे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष नितीन विश्वनाथ बामणे, सुधागड अध्यक्ष रवींद्र केशव खंडागळे, महिला अध्यक्ष समृद्धी संतोष यादव, महिला उपाध्यक्ष नंदिनी नंदकुमार पालांडे, तालुका सचिव स्वप्निल सुभाष मिणमीने यांच्यासह संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी व पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्य, सामाजिक सलोखा आणि जनहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!