E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
शुद्ध पाण्याच्या जारचे वाटप
रोहा पंचायत समितीच्या सदस्या समृद्धीताई कोळी यांचा स्तुत्य उपक्रम

खा. सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्यातील पूरग्रस्त कुटुंबांना शुद्ध पाण्याच्या जारचे वाटप
रोहा पंचायत समितीच्या सदस्या समृद्धीताई कोळी यांचा स्तुत्य उपक्रम

नागोठणे | महेश पवार
कोकणचे भाग्यविधाते लोकप्रिय खासदार, लोकनेते सुनिल तटकरे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात असतानाच रोहा पंचायत समितीच्या सदस्या सौ. समृद्धीताई कोळी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी यांनी नागोठण्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी खारीचा वाटा उचलत सुमारे १०० च्या वर कुटुंबांना प्रत्येकी २० लिटर शुद्ध पाण्याचे जार वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. नागोठण्याजवळील वेलशेत येथील श्री जाखमाता एक्वा चे मनोज ताडकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम पुढील काही दिवस राबविला जाणार आहे. पाणी जार वाटपाच्या कार्यक्रमाच्यावेळी खा. सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नागोठण्यातील पूरग्रस्त दोन्ही कोळीवाडा, बंगले आळी तसेच मोहल्ला भागातील पूरग्रस्त कुटुंबांना या शुद्ध पाणी जारचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरूवात सोमवार दिनांक १३ जुलै रोजी सायंकाळी कोळीवाड्यातील पूरग्रस्त कुटुंबांना पाण्याच्या जारचे वाटप करून करण्यात आली. कोळीवाड्यातील या छोटेखानी कार्यक्रमाला रोहा पंचायत समितीच्या सदस्या समृद्धीताई कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, अतुल काळे, अखलाक पानसरे, चंद्रकांत कोळी, मनोज ताडकर, मनोज टके, रोशन पारंगे, विजय पारंगे, अंकुश ताडकर, पुंडलिकभाई ताडकर, प्रमोद चोरगे, सम्राट ताडकर, घनःश्याम ताडकर, श्याम पाटील, मनोज वाघमारे, रयान पानसरे तसेच नागोठण्याच्या दोन्ही कोळीवाड्यातील बंधू भगिनी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




