E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थानियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़
अनिल पाटील यांची निवड
गावामध्ये शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न : अनिल पाटील

पिगोंडे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अनिल पाटील यांची निवड
गावामध्ये शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न : अनिल पाटील
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील पिगोंडे (ता. रोहा) ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या ग्रामसभेत पिगोंडे ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी वेलशेत गावचे माजी गाव अध्यक्ष अनिल नारायण पाटील यांची ग्रामस्थांकडून सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल पाटील यांचे उपस्थित ग्रामस्थांनी स्वागत करून अभिनंदन केले. गावातील वाद-विवाद, भांडणे व तंटे सामोपचाराने मिटवून गावामध्ये शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अनिल पाटील यांनी सांगितले.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही गावातील विविध तंटे संवाद व सामोपचाराच्या माध्यमातून सोडवून गावात शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकोपा, बंधुभाव व सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही अनिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

या ग्रामसभेस प्रशासक अध्यक्ष संदीप कुलम, सचिव कमलाकर लेंडी, माजी सरपंच संतोष कोळी, माजी तंटामुक्त अध्यक्ष बळीराम बडे, माजी उपसरपंच सखाराम घासे, गंगाराम मिणमिने, सौ. कांचनताई माळी, राजेंद्र लवटे, रोशन पारंगे, विठोबा माळी, सुमित पाटील, अंकुश ताडकर, कृष्णा बावकर, शांताराम माळी, मनोज पारंगे, गंगाराम पारंगे, नथुराम माळी, मंगेश पाटील (दादूस), वसंत घासे, नामदेव घासे, संतोष बडे, विजय बडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्यासाठी अनिल पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, त्यांच्या कार्यकाळात गाव तंटामुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.




