E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
नागोठण्यातील महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप

नागोठण्यातील महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप
नागोठणे | महेश पवार
रोहा तालुका महसूल खात्यातर्फे नागोठण्यातील शिवगणेश सभागृहात शनिवार दिनांक १४ मार्च रोजी घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात शालेय विद्यार्थी व नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात रोहाचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि रोहाचे तहसीलदार डॉ किशोर देशमुख यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.

या शिबिराला रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुमितदादा काते, रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, नायब तहसीलदार राजेश थोरे, नायब तहसीलदार पुंडलिक मोकल,
नायब तहसीलदार वैशाली काकडे, नायब तहसीलदार उज्वला अंधेरे, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भूमी अभिलेख कातडे साहेब, भाई टके, रोहा पंचायत समिती सदस्या अरुणा हंबीर, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृष्णा धामणे, अनंत वाघ, किशोरभाई म्हात्रे, संतोष कोळी, मनोहरभाई सुटे, प्रवीण ताडकर, निखिल मढवी, दिनेश घाग, नागोठणे मंडळ अधिकारी सुवर्णा पवार, नागोठणे ग्रामपंचायत सदस्या पूनम काळे, नागोठणे मंडळातील ग्राम महसूल अधिकारी प्रवीण साळुंखे, दिलीप खंदारे, कुलकर्णी, प्रियांका भोईर, योगेश वर्दे सर्व महसूल सेवक, नागोठणे विभागातील ग्रामपंचायत अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

या शिबिरात वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांसाठी स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये
महसूल विभाग विभागातर्फे प्रलंबित फेरफार निकाली काढणे, जिवंत सातबारा अंतर्गत वारस नोंदी करणे यांसह सातबारावरील नावात दुरुस्ती करून मान्यवरांच्या हस्ते जमीन मालकांना सातबारा वितरीत करण्यात आले. याशिवाय उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर दाखले, जातीचे दाखले देण्यात आले.

कृषि विभाग तर्फे पी एम किसान योजना, अँग्री स्टॅक योजना याविषयी माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. तर पुरवठा विभाग तर्फे रेशन कार्ड मध्ये नाव दाखल करणे, नाव कमी करणे, नाव ऑनलाईन करणे याविषयी नागरिकांना सहकार्य करण्यात आले. तसेच संजय गांधी शाखा/विभाग तर्फे संजय गांधी पेन्शन योजना, श्रावण बाळ पेन्शन योजना, निराधार व वयोवृद्ध यांना पेन्शन साठी फॉर्म स्वीकारले गेले व मार्गदर्शन करण्यात आले. सेतू केंद्र तर्फे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई साठी इ के वाय सी, ऑनलाईन दाखले वितरण याविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय ग्राम विकास विभाग तर्फे सर्वांसाठी घरे व इतर माहिती तसेच आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी व वन विभागाकडून नागरिकांना उपयुक्त माहिती देण्यात आली.




