Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

महाराष्ट्रातील ६२ विद्यार्थी पोहोचले इस्रोत 

इस्रोतील तज्ञांकडून विद्यार्थी घेणार तांत्रिक धडे

रायगडच्या चार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील ६२ विद्यार्थी पोहोचले इस्रोत 

इस्रोतील तज्ञांकडून विद्यार्थी घेणार तांत्रिक धडे
नागोठणे | महेश पवार
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतून इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या रायगडच्या चार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील ६२ विद्यार्थी इस्रोच्या अहमदाबाद (गुजरात) येथील केंद्रात सुखरूप पोहोचले असल्याची माहिती या स्पर्धेचे रायगड मधील संयोजक व भाजप शिक्षण सेलचे रोहा तालुका अध्यक्ष अशोक अहिरे यांनी दिली. 
महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सन २०११ पासून गुरुकुल एज्युकेशन सोसायटी ही संस्था राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आयोजित करीत आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच ही परीक्षा अशोक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली होती होती.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्यातील कु. सार्थक सुहास माने – इयत्ता ७ वी, सीकेटी इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू पनवेल,  कु. विनीत विनोद कापसे – इयत्ता ८ वी, द. ग. तटकरे उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड,  कु. साई योगेश म्हात्रे – इयत्ता ७ वी, रजिप पिगोंडे शाळा, नागोठणे परिसर,  कु. शुब्रा सुधीर शिंदे – ग. बा. वडेर हायस्कूल, पाली या चार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर विशेष यश मिळवत इस्रो भेटीसाठी मानाची निवड मिळवली होती.
रायगड मधील चारही विद्यार्थी गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी इस्रोच्या शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले. नंतर  शुक्रवार, दि. ५ जून रोजी ते इस्रोच्या अहमदाबाद (गुजरात) येथील विक्रम साराभाई अंतरीक्ष प्रदर्शनी या केंद्रात सुखरूप दाखल झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक व वैज्ञानिक ज्ञानवर्धनाच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची आणि इस्रोच्या अहमदाबाद येथील केंद्रातील तज्ञांकडून आठ दिवस हे विद्यार्थी तांत्रिक धडे गिरविणार असल्याची माहितीही अशोक अहिरे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!