E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

अधिवक्ता पारिजात पांडे कोकण दौऱ्यावर

अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेच्या वतीने वाकण येथे केले स्वागत 

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलवर निवडून आलेले अधिवक्ता पारिजात पांडे कोकण दौऱ्यावर 

अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेच्या वतीने वाकण येथे केले स्वागत 
नागोठणे | महेश पवार
नुकत्याच झालेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या निवडणुकीत प्रथम पसंतीची सर्वाधिक मते घेऊन निवडून आलेले सर्वांचे लाडके अधिवक्ता ॲड. पारिजात पांडे हे  कोकण दौऱ्यावर असताना रोहा व पाली बार असोसिएशनच्या आणि अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांची वाकण येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 
शुक्रवारी (दि. ३) दुपारी नागपूरहून निघालेले अधिवक्ता पारिजात पांडे सायंकाळी नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचे वाकण येथे सायंकाळी सात वाजता आगमन झाल्यानंतर रोहा वकील संघटना व अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांकडून त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.  रोहा व सुधागड तालुक्यांसाठी भविष्यात रोहा न्यायालयात सिनिअर डिव्हिजन कोर्ट सुरू करणे व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर अधिवक्ता पारिजात पांडे रत्नागिरीकडे रवाना झाले. 
यावेळी अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांत सचिव ॲड. श्रीराम ठोसर, अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे अध्यक्ष धनंजय धारप, उपाध्यक्ष समीर सानप, सचिव महेश घायले, कोषाध्यक्ष दिनेश वर्मा, अधिवक्ता परिषदेचे जिल्हा कार्यकारणीचे सदस्य ॲड. स्वराज मोरे, अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे सदस्य ॲड. शंकर हारपाल, ॲड. महेश पवार, ॲड. ओंकार शिलधनकर, ॲड. महेंद्र धामणे, ॲड. प्रतीक पाटणकर,  ॲड. सोनाली शहासने, ॲड. सत्यम बंडागळे आदींसह अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे सदस्य व वकील यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!