Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाहतूक

खा. सुनील तटकरे यांचे ठोस आश्वासन  

किशोरभाई जैन यांचे नागोठणे प्रवासी संघटनेला सहकार्य 

दिवा सावंतवाडी गाडीसह हॉलिडे  स्पेशल रेल्वे  गाड्या नागोठण्यात थांबण्यासाठी खा. सुनील तटकरे यांचे ठोस आश्वासन  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन व भाई टके यांचे नागोठणे प्रवासी संघटनेला सहकार्य 
नागोठणे | महेश पवार
जागतिक महामारी असलेल्या कोरोना (कोविड १९) मध्ये संपूर्ण देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्वत्र रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर कोकणात ये–जा करणारी गाडी नं. १०१०५ – १०१०६ दिवा -सावंतवाडी-दिवा ही पूर्वी नागोठणे रेल्वे स्थानकात थांबणारी गाडी कोरोना नंतर अचानक बंद करण्यात आली. रेल्वे मंत्र्यांना भेटून या गाडीसह गणपती व इतर हॉलिडे स्पेशल रेल्वे गाड्या नागोठणे रेल्वे स्थानकात थांबविण्यात येतील असे ठोस आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे प्रवासी संघटनेला दिले आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, भाई टके यांचे सहकार्य प्रवासी संघटनेला मिळाले आहे.
नागोठणे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी शनिवारी (दि.७) सकाळी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन नागोठणे रेल्वे स्थानकात न थांबणाऱ्या गाड्यांविषयी निवेदन देऊन त्या गाड्यांना लवकरात लवकर थांबा मिळावा अशी विनंती केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, भाई टके यांच्यासह नागोठणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश भोय, सचिव संदेश सुकाळे, सल्लागार ॲड. महेश पवार, शैलेश रावकर, विजय शहासने, बंटी मांडे, बबलू खंडागळे, पप्पू जैन, श्री. पांढरे, निलेश भिसे, मिलिंद जाधव, कैलास परदेशी, मुकेश भोईर, जी.पी. पाटील सर, शंकर हेंडे,  किसन तांडेल, संतोष कदम, अनिल देवरे, मल्हारी गायकवाड, नारायण म्हात्रे, पोशा आण्णा इयारकती आदींसह इतर पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
नागोठणे प्रवासी संघटनेने खा . सुनील तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  नागोठणे हे शिवकालीन वारसा लाभलेले तसेच भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्ह्याचे  महत्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागोठणे हे मेट्रोपॉलिटीन तसेच इंडस्ट्रीयल झोन आहे. नागोठणे शहरालगत रिलायन्स (NMD)  पृवीची IPCL,  जिंदाल ग्रुपची महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड, विभोर स्टील ट्यूब, सुप्रीम पेट्रोकेमिकल, जे.एस.डब्ल्यू स्टील असे मोठ मोठे कारखाने आहेत. तसेच नागोठणे शहरा आजूबाजूला पेण तालक्यातील अर्धा भाग, रोहा तालुक्यातील अर्धा भाग व सुधागड तालुका असे मिळून १२६ गावे आहेत. या सर्वांना रेल्वे प्रवासाकरिता मध्य रेल्वेचे नागोठणे रेल्वे स्थानकात यावे लागते. पण रेल्वे सुरु झाल्या पासून आता पर्यंत नागोठणे रेल्वे स्थानकात फक्त मुंबई दिशे कडे सकाळी ०५:३० वा. ०६:५५ वा. ११:१५ वा. व दुपारी १६:१० वा. आणि कोकण दिशे कडे, संध्या १८:३० वा., १९:२२ वा., व रात्री २०:३५ वा. रेल्वे सेवा आहे.  कोकण रेल्वे १९८६ साला पासून सुरु झाली पण कोरोना (कोविड १९) पूर्वी गाडी नं. १०१०५ – १०१०६ दिवा – सावंतवाडी – दिवा ही गाडी नागोठणे स्थानकात सकाळी कोकणात जातांना व  संध्याकाळी पनवेल, दिवा बाजूकडे जातांना थांबत असे.  पण कोरोना नंतर या गाडीचा थांबा अचानक बंद करण्यात आला आहे. नागोठणे हे शैक्षणिक हब असल्याने १०१०५ – १०१०६ दिवा – सावंतवाडी – दिवा या गाडीने विद्यार्थी व प्रवासी अप आणि डाउन करत असत. या गाडीचा नागोठणे थांबा बंद करण्यात आला आहे तो थांबा पूर्ववत देण्यात यावा व हॉलिडे स्पेशल मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना नागोठणे रेल्वे स्थानकात थांबा मिळावा तसेच गाड़ी नं १२६१९ – १२६२० लोकमान्य टिळक टर्मिनस(LTT) – मंगळूर सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस(LTT), १२६१७ – १२६१८ एर्णाकुलम जं – हज़रत निज़ामुद्दीन – एर्नाकुलम जं, १२६१८ – १२६२० व मुंबई LTT – मंगलोर – मुंबई LTT या एक्प्रेस गाड्यांना नागोठणे रेल्वे स्थानकात थांबा मिळावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीस खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!