E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातयुवाराज्यलोकल न्यूज़वाहतूक

उड्डाण पुलावर वाहतूक पुन्हा सुरू

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा

नागोठण्यातील मीरानगर उड्डाण पुलावर वाहतूक पुन्हा सुरू

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा
काही अपवाद वगळता वाहतूक सुरळीत 
नागोठाणे | प्रतिनिधी
नागोठणे मिरानगर येथील पुलाचे बांधकाम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाल्यानंतर या पुलावर वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या काही भागात सेटलमेंट (जमीन खचणे) झाल्याचे निदर्शनास आले.
या परिस्थितीचे तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी विविध तज्ज्ञ पथकांनी पुलाची आणि रस्त्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान प्राप्त झालेल्या तांत्रिक सूचनांच्या आधारे आवश्यक दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दुरुस्ती पूर्ण झाल्याने गणेशोत्सवासाठी हा पूल कार व प्रवासी वाहनांच्या वाहतुकीसाठी शनिवारी(दि.१२) सकाळी सुरू करण्यात आला.  
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकृत ठेकेदार कल्याण टोल प्लाझा लिमिटेड यांच्याकडून निर्धारित वेळेत सर्व आवश्यक सुधारात्मक कामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर  गणेशोत्सवापूर्वी नागोठणे पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असल्याचे कल्याण टोल प्लाझा कडून स्पष्ट करण्यात आले आहे.  काही किरकोळ अपवाद वगळता वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले आहे.
पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू झाल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी ये-जा करणाऱ्या लाखो गणेशभक्तांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात वाहतूक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागोठण्यातील या पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने या पुलावरून प्रवास करणाऱ्या कोकण वासियांनी व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. वेळेत दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकण वासीयांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!