Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
Uncategorized

भाएसो. एस.डी.परमार स्कूलचा १०० टक्के निकाल 

कु. आर्यन चितळे प्रथम 

भाएसो. एस.डी.परमार स्कूलचा १०० टक्के निकाल 

कु. आर्यन प्रवीण चितळे प्रथम 

नागोठणे | महेश पवार 
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील शैक्षणिक संकुलातीम एसडीपरमार इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के  लागला आहे. शाळेचे सर्व २५  विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.  परमार स्कूलने सुरुवातीपासूनची आपली १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही अबाधित ठेऊन उज्वल यश मिळविले आहे.

 एस.डी. परमार स्कूल मध्ये कु. आर्यन प्रवीण चितळे (८२.४० टक्के), कुमारी ज्योझी पानसरे (८२.२० टक्के) व कु. इझान सय्यद (८०.८० टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भा.ए.सो.चे संस्थापक, अध्यक्ष किशोरभाई जैन, उपाध्यक्षा संगीता जैन,  शाळा समिती चेअरमन सुरेश जैन, भाएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन व मुख्याध्यापिका अमृता गायकवाड यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!