E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवालोकल न्यूज़शिक्षण

विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेत सत्कार

कृषी सभापती वैंकुठशेठ पाटील यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन 

इस्रो संशोधन भेटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेत सत्कार

कृषी सभापती वैंकुठशेठ पाटील यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन 
नागोठणे | महेश पवार
गुरुकुल राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करीत इस्रो संशोधन भेटीसाठी निवड झालेल्या रायगड जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. सार्थक सुहास माने (इयत्ता ७ वी, सिकेटी इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू पनवेल), कु. विनीत विनोद कापसे (इयत्ता ८ वी, द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय, कोलाड), कु. साई योगेश म्हात्रे (इयत्ता ७ वी, रा. जि. शाळा पिगोंडे, नागोठणे) व कुमारी शुभ्रा सुधीर शिंदे (इयत्ता ७ वी, ग. बा. वडेर हायस्कूल, पाली) यांचा समावेश आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्या दालनात संपन्न झालेल्या या सत्कार समारंभास भाजप नेत्या गीता पालरेचा, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, भाजप रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर, रोहा तालुका शिक्षण सेल प्रमुख अशोक अहिरे, भाजप रोहा तालुका महिला मोर्चा अध्यक्षा अपर्णा सुटे, सोनाली पडवळ, पल्लवी माने, अनिल वाघ, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष अनिल खंडागळे, तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.
यावेळी सभापती वैकुंठशेठ पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा रोहा तालुका शिक्षण सेल प्रमुख अशोक अहिरे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. या सत्काराने विद्यार्थी भारावून गेल्याचे पहावयास मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!