E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलाटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला आनंदोत्सव
दिघेवाडी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

मिसेस महाराष्ट्र मानसी वाळंज मोकलने आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला आनंदोत्सव
दिघेवाडी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
नागोठणे | महेश पवार
स्मृती एंटरप्रायझेस प्रस्तुत “The Jewel One Pageant – Mrs Maharashtra 2026” या भव्य सौंदर्य स्पर्धेत विजेतेपदाचा मुकुट मिळवून मिसेस महाराष्ट्र हा किताब मिळविलेली नागोठण्याची लेक आणि पेण तालुक्यातील कारावी गावची सून मानसी वाळंज मोकल यांनी आपल्या या विजयाचा आनंदोत्सव सुधागड तालुक्यातील नांदगाव जवळील दिघेवाडी या आदिवासी वाडीतील राजिप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बुधवारी(दि.१) साजरा केला.
पाली येथीप सामाजिक कार्यकर्ते मयूर ठोंबरे यांच्याजवळ मानसी वाळंज यांनी आपल्या विजयाचा आनंद गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असल्याची भावना व्यक्त केली. तेव्हा मयूर ठोंबरे यांनी दिघेवाडी प्राथमिक शाळेचे नाव सुचविले. त्यानंतर लगेचच बुधवार दिनांक १ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या दिघेवाडी येथील प्राथमिक शाळेत जाऊन शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सुमारे ३५ विद्यार्थ्यांना वह्या, पेण, पेन्सिल अशाप्रकारच्या विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप मिसेस महाराष्ट्र मानसी वाळंज यांच्या हस्ते करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता मानसी वाळंज यांनी विद्यार्थ्यांसाठी खास मेजवानी म्हणून तयार करून नेलेल्या बिर्याणी पॅकेटचेही यावेळी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. यावेळी मिसेस महाराष्ट्र मानसी वाळंज मोकल यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
दिघेवाडी शाळेतील या उपक्रमात मिसेस महाराष्ट्र मानसी वाळंज मोकल यांच्यासह त्यांना नेहमी प्रोत्साहन देणारे त्यांचे पती दीपेश मोकल, मयूर ठोंबरे, पाली येथील रांगोळीकार व मेहंदी कलाकार अर्चना शेडगे, शाळेतील शिक्षक संजय थळे, संगीता रामभाऊ औताडे, साधुराम जाधव ,राजेंद्र दिघे शाळा व्यवस्थापन सदस्य चैताली मांढरे आरती चव्हाण आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.




