E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

अंबा नदीने ओलांडली धोका पातळी

सततच्या पावसामुळे अंबा नदी तुडुंब भरून वाहू लागली 

नागोठण्यातील अंबा नदीने ओलांडली धोका पातळी : प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा 

सततच्या पावसामुळे अंबा नदी तुडुंब भरून वाहू लागली 
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने संपूर्ण  नागोठणे परिसरातही पडलेल्या जोरदार पावसाने येथील आंबा नदी भरून वाहायला  लागली असून नदीने आपली धोका पातळी (९.० मी) ओलांडून ९.१० मी. एवढी पातळी गाठल्याचे प्रशासनाकडून शनिवारी (दि.४) सायंकाळी ६.०० वाजता काढलेल्या पत्रकामार्फत जाहीर केले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड येथील पूर नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी शनिवारी (दि.४) सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केलेल्या अंबा नदी पाणीपातळी अहवालानुसार अंबा नदीची धोका पाणी पातळी ९.०० मीटर असून ती ९.१० मीटर एवढी धोका पातळी पेक्षा अधिक नोंदली गेली आहे. तसेच सततच्या पावसामुळे  नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तर सावित्री, उल्हास आणि गाढी या नद्यांची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असली तरी सुरू असलेल्या पावसामुळे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पाटबंधारे विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान असे असले तरी नागोठणे येथील अंबा नदीच्या पाणी पातळीवर नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, प्रथम लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ मिलिंद धात्रक, विद्यमान उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे आदींसह ग्रामपंचायत यंत्रणा व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!