E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
भगवान महावीर जयंती निमित्त मटण व चिकन विक्रीची दुकाने बंद ठेवा
भारतीय जैन संघटनेचे नागोठणे ग्रामपंचायतीला निवेदन

भगवान महावीर जयंती निमित्त मटण व चिकन विक्रीची दुकाने बंद ठेवा
भारतीय जैन संघटनेचे नागोठणे ग्रामपंचायतीला निवेदन
नागोठणे | महेश पवार
भगवान महावीर स्वामी यांची जयंती ही जैन समाज बांधवांसाठी आणि सर्व प्राणी मात्रांसाठी महत्वाची मानली जाते. याच दिवशी अहिंसेचा आणि शांततेचा संदेश देण्यात येत असल्याने असा हा पवित्र दिवस मंगळवार दिनांक ३१ मार्च रोजी येत आहे. याच दिवशी भगवान महावीर यांची जयंती नागोठण्यातील जैन समाज बांधवांकडून उत्साहाने साजरी करण्यात येणार असल्याने नागोठणे शहरातील सर्व कत्तलखाने तसेच मटण व चिकन विक्रीची दुकाने ३१ मार्च रोजी बंद ठेवावीत अशी मागणी भारतीय जैन संघटना, रोहा च्या नागोठणे शाखेचे अध्यक्ष गौतम जैन व पदाधिकाऱ्यांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीला हे निवेदन देताना भारतीय जैन संघटनेचे नागोठणे शाखा शहराध्यक्ष गौतम जैन, सचिव प्रफुल्ल जैन, जुगनशेठ जैन, कमलेश जैन, जयंतीलाल जैन, श्रीपाल जैन, रितिक जैन, संजय जैन, हितेश जैन, पंकज जैन, विकेश जैन, बंटी जैन आदी जैन समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
यासंदर्भातील नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भगवान महावीरांनी “जगा आणि जगुद्या” हा अहिंसेचा महान संदेश दिला आहे. ही भावना जपण्यासाठी आणि या पवित्र दिवशी हिंसा रोखण्यासाठी यापूर्वीही शासनाने कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कत्तलखाने, मांस व चिकन विक्रीची दुकाने पूर्णतः बंद ठेवून यापूर्वीच्या आपल्या स्तुत्य उपक्रमाची यावर्षीही अंमलबजावणी करून जैन समाज बांधवांना सहकार्य करावे अशी मागणी भारतीय जैन संघटनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.




