E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शिक्षण

कोंडगाव प्राथमिक शाळेतील संगणक कक्षाचे राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्या हस्ते उद्घाटन 

विद्यार्थी गिरविणार संगणकीय धडे 

कोंडगाव प्राथमिक शाळेतील संगणक कक्षाचे राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्या हस्ते उद्घाटन 

विद्यार्थी गिरविणार संगणकीय धडे 
नागोठणे | महेश पवार 
रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठण्याजवळील कोंडगाव प्राथमिक शाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सुमितदादा काते यांच्या हस्ते शुक्रवारी(दि.२०) सायंकाळी संपन्न झाले.  यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या कोंडगाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता संगणकीय धडे गिरविणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.
कोंडगाव प्राथमिक शाळेत संपन्न झालेल्या या छोटेखानी उद्घाटन कार्यक्रमाला राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्यासह कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा धामणे, शिवसेना नेते विजय धामणे, राजू धामणे, शाखाप्रमुख रामचंद्र धामणे, प्रभाकर धामणे, मंगेश बुरूमकर, नितेश धाडसे, नारायण खोपरे, कोंडगाव प्राथमिक शाळेच्या  मुख्याध्यापिका सुषमा भटकर,  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दिपालीताई बुरमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुहास मालुसरे, अंगणवाडी शिक्षिका रसिका धामणे, अंगणवाडी सेविका ममता वाघ, दीपिका बुरुमकर आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका सुषमा भटकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!