Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रलोकल न्यूज़

नागोठणे येथे अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन

नागोठणे नगरीत चार दिवस दुमदुमणार श्री हरीनामाचा गजर 

नागोठणे येथे अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन

नागोठणे नगरीत चार दिवस दुमदुमणार श्री हरीनामाचा गजर 

नागोठणे | महेश पवार

नागोठण्यातील श्री संत सेवा मंडळाच्या वतीने येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात शुक्रवार दि. २० फेब्रुवारी ते सोमवार दि. २३ फेब्रुवारी या कालावधीत अखंड नामयज्ञ सोहळ्या अंतर्गत प्रवचन,  कीर्तनाच्या कार्यक्रमासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण होणार आहे. या सोहळ्याचे नियोजनबद्ध आयोजन श्री संत सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे नागोठणे नगरीत चार दिवस श्री हरीनामाचा गजर दुमदुमणार असल्याचे पहावयास मिळणार आहे

या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६  वा. काकड आरती, सकाळी ८.३० ते १२.३० आणि दुपारी २ ते ४.३० या दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायण होणार आहे. सायं. ५ ते ६ या वेळेत प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ तर रात्री ७ ते ९.३० वा. दरम्यान कीर्तन झाल्यानंतर भजन, जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

या नामयज्ञ सोहळ्यात शुक्रवारी (दि.२०) ह.भ. प. दिनेश महाराज कडव (वांदोळी) यांचे प्रवचन व ह. भ. प. नित्यानंद महाराज मांडवकर (चणेरा) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी गुरुवर्य ह.भ.प.विठोबा महाराज मांडलुस्कर यांचे प्रवचन व ह.भ.प. महेंद्र महाराज भोईर (भिवंडी) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. अनिल महाराज शिंदे (कडसुरे) यांचे प्रवचन तर ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्री (आळंदी) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. याचबरोबर सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वा. दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथील मठाधिपती गुरुवर्य ह.भ.प.नारायणदादा वाजे अलिबागकर महाराज यांचे काल्याचे किर्तन ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या पटांगणात संपन्न होणार आहे.
यानंतर अखंड नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने श्री हरीनाम गजरात दिंडी सोहळा संपन्न होणार असून यानंतर आलेल्या सर्व भाविकांना, ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद झाल्यानंतर या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. यावर्षी या अखंड नामयज्ञ सोहळ्याचे हे ५३ वे वर्ष असून हा धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न होण्यासाठी श्री संत सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!