Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

मनसेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पोलसानी यांची निवड 

शिवराज पोलसानी यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन !

मनसेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पोलसानी यांची निवड 

शिवराज पोलसानी यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन !
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्यातील बुलंद आवाज असलेल निष्ठावंत मनसे कार्यकर्ते व रायगड जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी यांचे छोटे सुपुत्र आणि नागोठण्यातील युवा मनसैनिक शिवराज गोवर्धन पोलसानी यांची मनसेच्या रायगड जिल्हा (रोहा तालुका क्षेत्र) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र स्वतः राज ठाकरे यांनी शिवराज पोलिसांनी यांना दिले.  या निवडीबद्दल शिवराज पोलसानी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या  आशीर्वादाने व आदेशानुसार आणि अमित ठाकरे यांचा सुचनेप्रमाणे तसेच मनसेचे नेते व रायगड जिल्हा संपर्क नेते संदीप देशपांडे, मनसेचे सरचिटणीस व रायगड जिल्ह्या संपर्क अध्यक्ष
योगेश परुळेकर, उपाध्यक्ष व रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश येरूणकर याच्या शिफारशीनुसार शिवराज पोलसानी यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मराठीचे, महाराष्ट्र धर्माचे, सन्मानीय राजसाहेब ठाकरे व परिवाराचे आम्ही पाईक असल्यानेच आमच्या त्यागाचे, संघर्षाचे, संयमाचे व निष्ठेचे मधुर फळ आम्हाला शिवतीर्थ दादर येथे सोमवार दिनांक १८ मे रोजी मनसेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या वेळी माझा सुपुत्र शिवराज पोलसानी याची मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करून मिळाल्याची भावना मनसेचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी यांनी व्यक्त केली आहे. 
(मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवराज पोलसानी यांना देण्यात आलेले नियुक्तीपत्र)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ नेत्यांच्या अहवालानुसार, पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी राज्यभरात सातत्याने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व फेरबदलांची प्रक्रिया सुरू असते. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांनी आगामी पालिका निवडणुका व संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रभर पक्षांतर्गत फेरबदल करत महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.  स्थानिक पातळीवर गळती रोखण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक आक्रमक करण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!