E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़राज्यलोकल न्यूज़शिक्षण

३४ वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव !

मुख्याध्यापक अनिल चौधरी यांचा नागोठणे नाभिक समाजाच्या वतीने सत्कार

शिक्षकी पेशाच्या ३४ वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव !

मुख्याध्यापक अनिल चौधरी यांचा नागोठणे नाभिक समाजाच्या वतीने सत्कार

नागोठणे : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देत तब्बल 34 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानसेवा बजावणारे तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निंब येथील नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल भगवान चौधरी यांचा नागोठणे शहर व विभाग नाभिक समाजाच्या वतीने रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता नाभिक समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी विशेष सत्कार करण्यात आला.
नाभिक समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या हस्ते मुख्याध्यापक अनिल चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीपभाई टके यांच्या समवेत नागोठणे शहर व विभाग नाभिक संघांचे सल्लागार शामकांत उर्फ आबा नेरपगार, हरीशभाई टके, रविंद्र टके, दिगंबर खराडे, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. महेश पवार, महेंद्र पवार, जगदीश दिवेकर, चेतन टके, अमित मोरे यांच्यासह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याध्यापक अनिल चौधरी हे शामकांत उर्फ आबा नेरपगार यांचे कॉलेज जीवनातील जिव्हाळ्याचे मित्र असून, तब्बल ४० वर्षांपासून त्यांची मैत्री अभेद्य आहे. या जुन्या मैत्रीच्या नात्याला उजाळा देत नाभिक समाजाने अनिल चौधरी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला.

‘नाभिक समाजाचा आयुष्यभर ऋणी राहीन’
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी नाभिक समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “नाभिक समाज बांधवांकडून माझा सत्कार झाला, याचा मला फार अभिमान वाटतो. या सन्मानामुळे माझ्या कार्याची समाजाने घेतलेली दखल ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. मी नागोठणे नाभिक समाजाचा आयुष्यभर ऋणी राहीन. नाभिक समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या हस्ते माझा सत्कार झाला म्हणजे खासदार सुनील तटकरे साहेबांच्याच हस्ते माझा सत्कार झाला, असे मी समजतो.”

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातही सत्कार
दरम्यान, सत्कार समारंभापूर्वी मुख्याध्यापक अनिल चौधरी, शामकांत नेरपगार, विष्णू सोनवणे, अनिल दुसाने व सुवर्णसिंग जमादार या कॉलेज जीवनातील मित्रांनी खडकआळी, नागोठणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी सेवा केंद्रातील प्रमुख सेवेकरी विजय खंडागळे व राजेंद्र जोशी यांच्या हस्ते मुख्याध्यापक अनिल चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.


३४ वर्षांची ज्ञानसेवा; विविध पुरस्कारांनी गौरव
मुख्याध्यापक अनिल भगवान चौधरी यांनी शैक्षणिक क्षेत्रात तब्बल ३४ वर्षे ज्ञानसेवा बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना २००५ मध्ये पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले तालुकास्तरीय पुरस्कार, २०२४ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार तसेच २०२५ मध्ये महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, येरवडा, पुणे या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच जुलै २०२६ मध्ये शासकीय राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले आहे. या गौरवामुळे नागोठणे शहर व विभाग नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आलेला हा सत्कार त्यांच्या ३४ वर्षांच्या ज्ञानसेवेचा सन्मान ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!