E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठण्याजवळील रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

चालक थोडक्यात बचावला

नागोठण्याजवळील रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

चालक थोडक्यात बचावला

नागोठणे | महेश पवार

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आणि नागोठण्याहून रिलायन्स कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (दि. ९) दुपारी बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. कारला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले होते. इको कारला आग लागल्याचे समजताच कारमधील चालकाने प्रसंगावधान दाखवून तो स्वतः बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे पूर्णतः नुकसान झाले आहे. हा अपघात सोमवारी (दि. ९) दुपारी ३  वाजण्याच्या सुमारास घडला. ही आग नक्की कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.

नागोठण्यातील मालक असलेली सदरची इको कार (क्र. एम.एच ०२ डी.जी ९९४१) ही नागोठण्याजवळील वाकण नाका येथून मुंबई गोवा महामार्गावरून नागोठणेकडून रिलायन्स कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होती. ही इको कार नागोठण्यातील पेण बाजूला असलेल्या कमानीच्या थोडी पुढे आल्यानंतर या कारला कोणत्या तरी अज्ञात कारणाने अचानक आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालक तातडीने कार बाहेर आला. मात्र आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने कार मध्ये असलेले गाडीचे पेपर, चालकाचे ड्रायव्हिंग लायसन व अन्य काही महत्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे तसेच सुमारे अडीच हजार रुपयांची रोकड आणि रस्त्याच्या आजू बाजूला असलेली झाडेझुडपे  या आगीत जळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

इको कारला लागलेली आग विझविण्यासाठी  रिलायन्स कंपनीच्या अग्निशामक दलाला बोलवण्यात आले होते. त्यामुळे आग पूर्णता आटोक्यात आली.  त्याआधी काही स्थानिक नागरिकांनी पाण्याचा टँकर बोलवून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर थोड्याच वेळात इको कारला लागलेली आग विझविण्यात आली. मात्र जर का कारमधील सी.एन.जी. टँकचा स्फोट झाला असता तर परिसरात मोठे नुकसान झाले असते असे बोलले जात आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!