Uncategorized

निवडणुकीत अपयश मिळाले असले तरी खूप नवीन कार्य करायचे आहे : किशोरभाई जैन 

किशोरभाई जैन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

निवडणुकीत अपयश मिळाले असले तरी खूप नवीन कार्य करायचे आहे : किशोरभाई जैन 

किशोरभाई जैन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
नागोठणे | महेश पवार
जीवनात यश अपयश या गोष्टी होतच राहतात. पराभवाने खचून न जाता ज्या नवनवीन ओळखी झाल्या त्यांच्या सोबतीने अजून समाजकार्य करतच राहीन आणि गतवर्षाच्या झालेल्या चुकांचे अवलोकन करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. तसेच जिल्हा परिषद  निवडणुकीत अपयश मिळाले असले तरी मला अजुन खुप नवीन कार्य करायचे आहे असे मनोगत भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी १० मार्च रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेलशेत येथील भाएसो विद्यासंकुलातील श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. 
(फोटो : किशोरभाई जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना माजी आमदार अनिकेतभाई तटकरे पहिल्या तर शुभेच्छा देताना भाई टके, ॲड. महेश पवार, शंकर पाटील, बंटी मांडे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहेत) 
किशोरभाई जैन पुढे म्हणाले की, सर्व लोक मला  किती वर्षाचे झालेत असे विचारतात.  तेव्हा मी २५ वर्षांचा झालो असे सांगतो.   कारण मला  नेहमी असे वाटतं की, त्या  २५ वर्षे वयाप्रमाणेच मी आजही काम करत आहे.   आयुर्वेदिक रुग्णालय अहोरात्र चालावे अशी माझी  इच्छा आहे.  त्यासाठी माझे प्रयत्न देखील चालू आहेत. भविष्यात एम. फार्मसी सुरू करणार  असल्या बद्दल इच्छाही यावेळी किशोरभाई जैन यांनी व्यक्त केली. तसेच  निवडणुकी दरम्यान कॉलेजमध्ये एक महिना येऊ शकलो  नसलो तरी सर्व स्टाफने आपुलकीने खूप सहकार्य केले असून मेडिकल कॉलेजमध्ये शंभर टक्के प्रवेश झाल्यामुळे पुढील वर्षातही असेच काम स्टाफ कडून होईल असा आशावाद त्यांनी  यावेळी व्यक्त केला.
आपल्या घरी सकाळी परिवारासोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर किशोरभाई जैन यांनी कॉलेजमध्ये सर्वांसोबत वाढदिवस साजरा करून आनंद द्विगुणित केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून किशोरभाई जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलातील सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उपस्थित राहून त्यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!