Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

बाळसई येथे श्री. बेलजाई मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 

तरुणींचा एकाच रंगाचा ड्रेस ठरला आकर्षण

बाळसई येथे श्री. बेलजाई मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 

तरुणींचा एकाच रंगाचा ड्रेस ठरला आकर्षण
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील बाळसई (ता.रोहा)  गावाची ग्रामदेवता श्री.आई बेलजाई मातेच्या मंदिराच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य असा पालखी मिरवणूक सोहळा सोमवारी (दि.२३) अतिशय उत्साहमय वातावरणात संपन्न झाला. पाली येथिल पुरोहित प्रसाद जोशी गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांकडुन शकली असा विविध धार्मिक विधी करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्री. बेलजाई मातेच्या मंदिरातुन बेलजाई मातेच्या पादुकांची फुलांनी सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. श्री. बेलजाई मातेचा जयघोष तसेच बेजोंच्या तालावर नाचण्यात गावातील तरुण – तरुणी, महिला – पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यात बाळसई गावातील तरुणींनी प्लॅनिंग करून ऑनलाईन पद्धतीने आणि खूप थोड्या दिवसांत मागविलेले एकाच रंगाचे ड्रेस पालखी सोहळ्याचे आकर्षण ठरले. 
यावेळी गावात सर्वत्र आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच प्रत्येकांनी घरासमोर गुढी उभारली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई – ठाणे व इतरत्र असलेले चाकरमानी तसेच माहेरवाशिणी या पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. हा भक्तिमय  रुपातील सोहळा रात्री ११.०० वाजता मंदिरात पोहचला. यावेळी उपस्थितांकडुन बेलजाई मातेचा जयघोष करण्यात आल्यानंतर आरती घेण्यात आली. शेवटी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या भक्तांना महाप्रसाद देण्यात आल्यावर ग्रामस्थ व वारकरी भजन मंडळ, बाळसई यांच्या सुश्राव्य संगीत भजनाने व जागरणाने या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा संपुर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली बाळसई ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ,  बेलजाई मित्र मंडळ मुंबई, बेलजाई क्रिडा मंडळ, मुंबई मंडळ, बाळसई यांनी अपार मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!