E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनमहाराष्ट्रराजकारणराज्यलोकल न्यूज़
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुली त्वरित बंद करा
२१ मे रोजी रायगड प्रेस क्लब ठिय्या आंदोलन : एस एम देशमुख राहणार उपस्थित

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुली त्वरित बंद करा
२१ मे रोजी रायगड प्रेस क्लब ठिय्या आंदोलन :
एस एम देशमुख राहणार उपस्थित
नागोठणे : अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुरू करण्यात आलेली टोलवसुली तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच महामार्गाचे काम पूर्ण होऊन अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टोलवसुली थांबवावी, अशी ठाम मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान २१ मे रोजी खारपाडा टोल नाक्यावर रायगड प्रेस क्लब च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तसेच रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात सुरू केलेला खारपाडा टोल नाका त्वरित बंद करावा अशी मागणी करित या संदर्भात सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकाऱ्यांना रायगड प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. महामार्गाचे अनेक भाग अद्याप अपूर्ण असून रस्त्याच्या कामांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून टोल आकारणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





