E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनिधनमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
चंद्रकांत कामथे यांचे अकस्मात निधन

चंद्रकांत कामथे यांचे अकस्मात निधन
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील आंगरआळी येथील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण कामथे (वय ७८) यांचे बुधवार दिनांक २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात अकस्मात निधन झाले. अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य बचाव अधिवक्ता ॲड. शेखर कामथे यांचे ते वडील होत. चंद्रकांत कामथे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दिवंगत चंद्रकांत कामथे यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत चंद्रकांत कामथे हे धाटाव औद्योगिक वसाहती मधील सुदर्शन केमिकल्स या कंपनीतून ते सेवानिवृत्त झाले होते. कंपनीतील युनियन कमिटीमध्ये त्यांनी त्यांच्या विभागातून कामगारांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे मित्रपरिवाराच्या व ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकांमध्ये विनोदी चुटक्यांतून ते रंगत आणत असत. अशा या आपल्या मित्राच्या अचानक जाण्याने त्यांच्या मित्रपरिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत चंद्रकांत कामथे यांच्या पार्थिवावर अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नागोठणे शहर व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील वर्ग, कामथे परिवारातील सगेसोयरे, आप्तेष्ट, यांच्यासह नागोठणे शहर व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत चंद्रकांत कामथे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक ५ जून रोजी उद्धर (ता.सुधागड) तर उत्तरकार्य रविवार दिनांक ७ जून रोजी आंगरआळी – नागोठणे येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे कामथे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.




