Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

मिरानगर भागातील जंगलात गुरांची कत्तल

नागोठणे पोलिसांकडून ३० हजार, ६६० रुपयांचा  गोमांस जप्त 

नागोठण्यातील मिरानगर भागातील जंगलात गुरांची कत्तल : तीन आरोपी अटकेत 

नागोठणे पोलिसांकडून ३० हजार, ६६० रुपयांचा  गोमांस जप्त 
नागोठणे पोलीसांची धडाकेबाज कामगिरी : बेकायदेशीर गोवंश कत्तल करणाऱ्यांचा  पर्दाफाश
नागोठणे | महेश पवार
गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करून त्या गोवंश जातीच्या प्राण्यांच्या मासाचे तुकडे करत असलेल्या आणि पोलिसांना बघून पळण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींच्या नागोठणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गोवंश प्राण्यांची हत्या प्रकरणी याआधी विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या आरोपींमध्ये मुझफ्फर इकबाल पानसरे, नवाब मोहम्मद शेख व समीर अयुब शेख (तिघेही रा. मिरानगर, नागोठणे) या तिघांचा समावेश आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम च्या विविध कलमांद्वारे दिनांक ३ जुलै रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागोठणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत असून नागोठणे शहर व परिसरातील अवैध धंद्यांचाही प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांनी बंदोबस्त करावा अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार नागोठण्यातील मिरानगर भागातील पाठीमागे असलेल्या जंगलात गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत नागोठणे पोलिसांना गुरुवारी(दि.२) सायंकाळी मिळाली. त्यानुसार नागोठणे पोलिसांचे पथक सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी गेले असता तीन जण गोवंश जातीच्या दोन प्राण्यांची कत्तल करून त्या प्राण्यांच्या मासाचे तुकडे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच तेथून पळून जाणाऱ्या तीन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळावरून ०२ गोवंश प्राण्याचे कत्तल करण्यात आलेले गोमांस जप्त करून  तांबडी-पांढरी रंगाच्या लांब शिंगे असलेल्या एक गाईला वाचवण्यात यश आले आहे. जप्त केलेल्या गोमांस मालाची एकूण किंमत ३० हजार ६६०/- रुपये असल्याची माहिती नागोठणे पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, रोहाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत सहभागी झालेल्या नागोठणे पोलिस ठाण्याच्या पथकात नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि रविंद्र पारखे, उपनिरीक्षक राजहंस नागदिवे, उपनिरीक्षक नरेश थळकर, सहाय्यक फौजदार कृष्णा म्हात्रे,  पो.हवा. अथर्व पाटील, पो हवा. चंद्रशेखर नागावकर, वाहतूक शाखेचे पो.हवा. मनोहर माळी, पो.शि. स्वप्निल भालेराव, पो.शि. बळी पुट्टेवाड, पो.शि.विक्रांत बांधणकर, पो.शि. शिवदास धुळगंडे आदी सहभागी झाले होते. यावेळी वनखात्याचे नागोठणे बीटचे वनरक्षक मधू सोनवणे हेसुद्ध सरकारी पंच म्हणून उपस्थित होते.  याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे  पुढील तपास करीत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!