E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifऐतिहासिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

रघुजीराजे आंग्रे यांची भेट

आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष किशोरशेठ जैन यांनी केले रघुजीराजे यांचे स्वागत 

रघुजीराजे आंग्रे यांची श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला सदिच्छा भेट !

आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष किशोरशेठ जैन यांनी केले रघुजीराजे यांचे स्वागत 

नागोठणे | महेश पवार

मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नववे वंशज असलेले सरदार रघुजीराजे आंग्रे यांनी नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील श्रीमंती शांताबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला शनिवार दिनांक ११ जुलै रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किशोरशेठ यांनी सरदार रघुजीराजे आंग्रे यांचे यथोचित स्वागत केले. यावेळी किशोरशेठ जैन यांनी रघुजीराजे यांना  आयुर्वेदिक कॉलेज विषयी माहिती दिली. 


श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ तसेच गाज फाउंडेशनचे अध्यक्ष असलेले रघुजीराजे आंग्रे हे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि भावी पिढीमध्ये स्वराज्याचा इतिहास व राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी करीत असलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. कोकणात आंग्रे घराण्याचा ऐतिहासिक वारसा जपणे आणि मराठा इतिहासाचा प्रसार करण्यात ते सक्रिय आहेत.  त्यांच्या या राष्ट्रसेवेच्या आणि समाजहिताच्या कार्याला यावेळी किशोरशेठ जैन यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सरदार रघुजीराजे आंग्रे यांच्यासह मंदार परांजपे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आमच्या महाविद्यालयात मनःपूर्वक स्वागत करण्याची संधी मिळाल्याबद्दल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाच्या वतीने रघुजीराजे यांच्या सदिच्छा भेटीबद्दल किशोरशेठ जैन यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी नागोठणे गावाची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, शिवरामभाऊ शिंदे, भारतीय एज्युकेशन सोसायटीचे सी.ई.ओ कार्तिक जैन, मेडिकल कॉलेजचे रजिस्टार प्रा. वैभव नांदगावकर आदींसह सरदार रघुजीराजे आंग्रे यांचे सहकारी मंदार परांजपे व इतर मान्यवर उपस्थित होते.

रघुजीराजे आंग्रे यांनी जपलाय आपला ऐतिहासिक वारसा : 
रघुजीराजे आंग्रे त्यांच्या अलिबाग येथील ‘घेरीया’ या निवासस्थानी दरवर्षी दसऱ्याला सरखेल कान्होजीराजे यांच्या काळातील प्राचीन शस्त्रांची पूजा करण्याची ३२३ वर्षांची परंपरा ते अखंडपणे चालवत आहेत. इतिहास संवर्धन: ते ‘किल्ला रायगड विकास प्राधिकरण’चे सदस्य असून, ‘गाज फाउंडेशन’च्या (Gaaj Foundation) माध्यमातून युवकांमध्ये सागरी इतिहास आणि देशप्रेमाची जाणीव जागृत करण्याचे कार्य करत आहेत. राष्ट्रीय योगदान: ते ‘लोथल’ येथील राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालयासाठी (National Maritime Heritage Museum) सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!