Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
Uncategorized

बायो कंपोस्टचा ढीग

होली एंजल्स शाळेसमोर रिलायन्स कंपनीच्या बायो कंपोस्टचा ढीग

रिलायन्स प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी व नागरिकांचा नाक मुठीत घेऊन प्रवास

नागोठणे | महेश पवार

रिलायन्स कंपनीमधून दुर्गंधीयुक्त बायो कंपोस्ट हा टाकाऊ माल घेऊन जाणाऱ्या डंपर मधून बायो कंपोस्ट पडल्याने नागोठण्यातील होली एंजल्स स्कूलच्या प्रवेश द्वारासमोरच बायो कंपोस्टचा मोठा ढीग तयार झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. १५) सकाळी घडली आहे. कोणतीही खबरदारी न घेतल्याने, रिलायन्स कंपनी प्रशासनाच्या कमालीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यांना नाक मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे.

रिलायन्स कंपनीच्या बायोकंपोस्टची वाहतूक नेहमीच अत्यंत निष्काळजीपणे आणि कोणतीही खबरदारी न घेता केली जात असल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे. बायो कंपोस्टचा हा ढीग थेट शाळेसमोर पडल्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे देखील कठीण झाले असून लहान मुलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पालक आणि शाळा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून रिलायन्स कंपनी प्रशासनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.


दरम्यान मुख्य रस्त्यावरच बायो कंपोस्टचा हा ढीग पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या ढिगाऱ्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हा ढिगारा हटविण्यासंदर्भात रिलायन्स वा संबंधित खात्याकडून दुपारपर्यंत कितीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी रिलायन्स प्रशासनावर व निष्काळजीपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त झालेल्या नागोठणेकर नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!