E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम

द्वितीय वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागोठणे | महेश पवार
एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागोठणे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी द्वितीय वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाची दिशा, अभ्यासाचे महत्त्व आणि करिअर नियोजन याबाबत मार्गदर्शन करताना मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. विशाल पाटील,  अकॅडमिक को-ऑर्डिनेटर प्रा. निधी ढसाळे तसेच संगणक विभागप्रमुख प्रा. सागर सुरेकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, कौशल्य विकास, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवेश यादव यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या विविध संधी, व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योगविश्वातील अपेक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक संधीचा सकारात्मक उपयोग करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कार्तिक जैन यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत, “एस.एस.ओ.एस.पी. महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान बाळगा. शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर यश निश्चित मिळते,” असे सांगत सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, शैक्षणिक अपेक्षा आणि भविष्यातील करिअर नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नवीन शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात केली. सदर कार्यक्रमात इलेक्ट्रिकल विभागप्रमुख ज्योती पालवे, प्रथम वर्ष विभागप्रमुख नीलम पाटील, सर्व विभागातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन द्वितीय वर्ष (AIML) विभागाची विद्यार्थिनी श्रावणी जाधव हिने उत्कृष्टरीत्या केले. यावेळी तिने प्राचार्य डॉ. प्रवेश यादव यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव व कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!