E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्रीडाखेलधार्मिकनियुक्तीमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

ॲड. रमेश जाधव यांची निवड

छ. शिवाजी महाराज चौकात किशोर जैन मित्रमंडळाचा दहीहंडी सोहळा रंगणार 

किशोर जैन मित्रमंडळ दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी ॲड. रमेश जाधव यांची निवड

छ. शिवाजी महाराज चौकात किशोर जैन मित्रमंडळाचा दहीहंडी सोहळा रंगणार
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील किशोरशेठ जैन मित्र मंडळ यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या अनेक वर्षांपासून भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या दहीहंडी सोहळ्यासाठी दरवर्षी उत्सव समिती निवडण्यात येत असते.  यावर्षीच्या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी ॲड. रमेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल किशोर शेठ जैन मित्र मंडळाचे सर्वेसर्वा किशोरभाई जैन यांनी ॲड. रमेश जाधव व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना दहीहंडी उत्सव सोहळा दिमाखात साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या दमाच्या दहीहंडी उत्सव समितीच्यामुळे यावर्षी किशोर जैन मित्रमंडळाचा दहीहंडी सोहळा दरवर्षी पेक्षा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
किशोरभाई जैन मित्रमंडळ दहीहंडी उत्सव समितीच्या उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष अर्चित भिसे, सचिव मंदार मोरे, खजिनदार घनश्याम ताडकर, कार्यवाहक धनंजय जगताप, जितेंद्र जाधव, मनोज टके, ॲड. प्रकाश कांबळे, सुरेश गिजे तर सदस्य म्हणून केतन भोय, रोशन गुरव, ऋषिकेश कारखानीस, भावेश खंडागळे, महेंद्र नागोठणेकर, सिद्धार्थ गिजे, मनीष पवार, राजेश पिंपळे आदींची निवड करण्यात आली आहे. 
किशोरभाई जैन यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या नव्या दहीहंडी उत्सव समितीच्या या सत्कार सोहळ्याला नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, शैलेश रावकर, बबलू खंडागळे आदींसह तरुण वर्ग यावेळी उपस्थित होता. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!