E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

आ. अनिकेतभाई तटकरे यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

समाजाच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच राहील : किशोर जैन

आदिवासी व ठाकूर समाजाच्या प्रश्नांवर आ. अनिकेतभाई तटकरे यांची पाली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक

आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच राहील : किशोरभाई जैन

नागोठणे | महेश पवार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील दमदार युवा आमदार अशी ओळख असलेले आ. अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक सुधागड तालुका पंचायत समितीच्या कै. नामदेवशेठ खैरे सभागृहात मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. 

पाली येथील या बैठकीत वनहक्क कायद्यांतर्गत आदिवासी व ठाकूर समाजाचे प्रलंबित दावे, पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळणे, वन्यप्राण्यांमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच दुर्गम वाड्यांमधील वीज, घरकुल, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत आमदार अनिकेत तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून आदिवासी व ठाकूर समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे खा. सुनील तटकरे यांनी मोबाईलद्वारे बैठकीत सहभाग घेत उपस्थित मान्यवर व अधिकारी वर्गाला योग्य असे मार्गदर्शन केले.

या बैठकीस आ. अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता, सुधागड तालुका पंचायत समितीच्या सभापती जागृती मानकर, उपसभापती संदेश शेवाळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुरवड, सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार,  गटविकास अधिकारी लता मोहिते यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी व ठाकूर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आजची बैठक महत्त्वपूर्ण ठरली. आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी यापुढेही पाठपुरावा सुरूच राहील असे यावेळी राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांनी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!