E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाक्राइमटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाहतूक

गुन्हे अन्वेषण शाखेने लावला छडा

तीन राज्यात ६८ गुन्हे दाखल असलेला आरोपी जेरबंद

नागोठण्यातील घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला छडा

तीन राज्यात ६८ गुन्हे दाखल असलेला आरोपी जेरबंद
नागोठणे | महेश पवार
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील आयटीआय कॉलेज समोरील एका इमारतीत कुलूप बंद असलेला फ्लॅट भर दिवसा फोडून रोकड व दागिने यांच्या स्वरूपात लाखो रुपयांच्या ऐवज लंपास केलेला अट्टल चोरट्याला रायगड पोलिसांच्या  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. दिनांक ९ सप्टेंबर, २०२६ रोजी नागोठण्यात भर दिवसा घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपी लोकेश रावसाहेब सुतार, रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली यास ताब्यात घेण्यात आले. या आरोपीवर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यात सुमारे ६८ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करिता नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि रविंद्र पारखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
नागोठणे पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग यांचेकडून सुरू होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पो.ह. विनोद पाटील, पो.ह. अमोल हंबीर, पो.ह. प्रतीक सावंत, पो.ह. शामराव कराडे, पो.ह. अक्षय पाटील व पो.ह. तुषार घरत यांचे पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाई बद्दल रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 
आरोपी लोकेश सुतार विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, आर्म्स ॲक्ट तसेच खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी लोकेश सुतार हा सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाहिजे आरोपी म्हणून नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
नागोठण्यातील याच गुन्ह्यातील आरोपी क्र. २ सुखदेव हनुमंत नाईक, वय २६ वर्षे, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली याने तपास पथकाच्या वाहनास धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील नाकाबंदी दरम्यान त्याने शासकीय वाहनांचे नुकसान केले आणि  नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले पोलीस अंमलदार निरोझ रझाक शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केले.
याप्रकरणी आरोपी सुखदेव हनुमंत नाईक याच्याविरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आरोपीलाही त्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाचे थार वाहन जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!