E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifखेलमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

श्रेयस शेडगे याला ऑल इंडिया पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रौप्य पदक

श्रेयस शेडगे याला ऑल इंडिया पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रौप्य पदक

नागोठणे | महेश पवार
महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी रोहतंग येथे दि. ९ ते १३ मार्च दरम्यान भरविण्यात आलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशीप या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.  या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यातील नागोठणे गावचा सुपुत्र कु.श्रेयस सचिन शेडगे याने गार्डन सिटी युनिव्हर्सिटी बंगलोर या युनिव्हर्सिटी कडून खेळताना सोलो या प्रकारात रौप्य पदक पटकविले आहे. 
      श्रेयसला लहानपणापासून पिंच्याक सिल्याट या खेळामध्ये आवड असून त्याने या खेळात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर  अनेक पदक प्राप्त केली आहेत.   श्रेयस याला महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे सचिव व प्रमुख मार्गदर्शक मास्टर किशोर येवले यांचे मार्गदर्शन  लाभले आहे.  श्रेयस याने रौप्य पदक मिळविल्याबद्दल गार्डन सिटी युनिव्हर्सिटी बंगलोर तसेच महाराष्ट्रातील अनेक स्तरांतून श्रेयस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!