Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनदिल्ली NCRमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

नागोठणे रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नांसाठी नागोठणे प्रवासी संघटना सरसावली 

दिवा – सावंतवाडी गाडीला पूर्ववत थांबा मिळण्यासह अनेक मागण्यांवर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी चर्चा 

नागोठणे रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नांसाठी नागोठणे प्रवासी संघटना सरसावली 

दिवा – सावंतवाडी गाडीला पूर्ववत थांबा मिळण्यासह अनेक मागण्यांवर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी चर्चा 

नागोठणे | महेश पवार
झपाट्याने औद्योगीकरण झालेल्या आणि रिलायन्स कंपनीचा महाकाय प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असलेल्या नागोठणे शहर व विभागास मध्य रेल्वे कडून नेहमीच सापत्न वागणूक दिली गेली आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेत समाविष्ट असलेल्या नागोठणे या मध्यवर्ती स्थानकात प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातीलच काही समस्या तरी मार्गी लागण्यात यासाठी नागोठणे प्रवासी संघटना सरसावली असून मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांची प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई सी एस टी येथील कार्यालयात शुक्रवारी(दि.१७) भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी नागोठणे प्रवासी संघटनेचे सल्लागार ॲड. महेश पवार, अध्यक्ष ऋषिकेश भोय, सचिव संदेश सुकाळे, कंटप्पा तांडेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत डॉ. स्वप्नील नीला यांनी सकारात्मक प्रतिसाद देत काही समस्या तरी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. 
नागोठणे शहर व परिसरातील नोकरदार त्यांच्या कार्यालयात आणि विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयात  पोहोचण्यासाठी दररोज एका बाजुचा ५० ते १०० किलोमीटर प्रवास करीत आहेत.  अनेक व्यावसायिक देखील दररोज इतकेच अंतर प्रवास करतात. नागोठणे परिसरात रेल्वे सेवा सुरू होऊन ४० वर्षे झाली तरी अद्याप या विभागात रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ झालेली नाही. विशेष म्हणजे नागोठणे रेल्वे स्टेशनवरून दररोज एक्स्प्रेस आणि इतर रेल्वेगाड्या
धावतात. तथापि, नागोठणे आणि नागोठणे परिसरात १०४ गावे येतात आणि या रहिवाशांच्या सेवेसाठी केवळ सहा रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. मध्य रेल्वे प्रशासन रोहा आणि दिवा स्थानका दरम्यान दररोज तीन पॅसेंजर गाड्या चालवते, परंतु या गाड्या रोहाहून इतक्या गर्दीने भरून येतात की, नागोठणे आणि नागोठणे परिसरातील रहिवाशांना रेल्वेने प्रवास करताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागोठणे प्रवासी संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्या : 
१) गाडी क्रमांक १०१०५-१०१०६ दिवा सावंतवाडी-सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडी नागोठणे रेल्वे स्थानकावर कोरोना (कोविड १९) पूर्वी थांबत असे पण कोरोना नंतर तिचा थांबा बंद करण्यात आला तो थांबा पूर्ववत करण्यात यावा. २) गणपती स्पेशल / हॉलिडे स्पेशल गाड्यांना नागोठणे रेल्वे स्थानकावर थांबा मिळवा.
३) ६१०१९-६१०२० दिवा – पेण – दिवा गाडीचा नागोठणे पर्यंत विस्तार करावा, ४) प्लॅटफॉर्म २ व ३ ची उंची कमी असल्यामुळे, अनेक प्रवाशांनी आपले शारीरिक अवयव व जीव गमावले आहेत. त्यामुळे, प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ ची उंची वाढवावी.
५) नागोठणे रेल्वे स्थानकावर आरक्षित तिकीट मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी या प्रमुख मागण्यांसह इतरही काही समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!